आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही काम नसल्याने विरोधकांकडून आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विरोधकांना काहीच कामे नाहीत. त्यामुळेच त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. विरोधकांनी कितीही ओरड केली, तरी विकासकामे कोण करतात, हे जनतेला माहिती आहे. शिवसेनेवर वेळोवेळी विश्वास दाखवून जनतेने ते सिद्धही केले आहे, अशी टीका महापौर शीला शिंदे यांनी विरोधकांवर केली.

नगर शहरातील सक्कर चौक ते मल्हार चौक रस्त्यावर बसवण्यात आलेल्या पथदिव्यांच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक नितीन जगताप, दीपक खैरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे, डॉ. रसिक मुथा, मेहूल भंडारी, गणेश औसरकर, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.

शिवसेना 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करते. त्यामुळे शहरात आतापर्यंत अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. विरोधक मात्र केवळ र्शेय लाटण्यासाठी फक्त आरडाओरड करतात. काही विकासकामे त्यांच्या काळात मंजूर झाली असली, तरी ती मार्गी लावण्याचे काम शिवसेनेने केले. त्यामुळे त्यांना र्शेय घेण्याचा काहीच अधिकार नाही. काम नसल्याने केवळ बिनबुडाचे आरोप केले म्हणजे र्शेय मिळेल, या भ्रमात विरोधकांनी राहू नये, असे महापौरांनी सुनावले. फेज टू पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहराचा पुढील 50 वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. नगरोत्थान योजनेतून बालिकार्शम, कोठी ते यश पॅलेस, तसेच टिळकरोडचे काम सुरू आहे. चंदन इस्टेट ते पुणे महामार्गापर्यंतचा रस्तादेखील मॉडेल रस्ता करणार असल्याचे सांगत विकासकामांच्या माध्यमातूनच विरोधकांना चोख उत्तर दिले असल्याचे महापौर शिंदे यांनी सांगितले.