आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपीला साडेतीन महिन्यांच्या कैदेसह आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी शुक्रवारी दुपारी हा निकाल दिला. राकेश सुरेश शिंदे (केडगाव) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार केडगावातील एका गिरणीसमोर घडला होता. राकेश याने जून २०१६ मध्ये गिरणीत आलेल्या एका अल्पवयीन मुलीला अपशब्द वापरून तिची छेडछाड केली होती. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी राकेशविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार, तसेच विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. फौजदार जी. डी. करेवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एम. पी. कुलकर्णी यांनी एकूण साक्षीदार तपासले. त्यापैकी फिर्यादी मुलगी, तिचे आई-वडील तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून साडेतीन महिने शिक्षा ५०० रुपयांचा दंड ठोठावला. 
बातम्या आणखी आहेत...