आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशपांडे रुग्णालयासाठी विशेष निधी द्या - महापौर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची नवीन इमारत व स्वतंत्र बालरुग्णालय उभारण्यासाठी, तसेच हद्दवाढीत समाविष्ट गावांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महाराष्ट्र वित्त आयोगाकडून विशेष निधी मिळावा, अशी मागणी महापौर शीला शिंदे यांनी गुरूवारी वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांच्याकडे केली.

मनपाचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी डांगे यांनी मनपा कार्यालयात पदाधिकारी व अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी उपमहापौर गीतांजली काळे, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, प्रभारी उपायुक्त संजीव परशरामी, मुख्य लेखाधिकारी प्रदीप शेलार, शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, नगररचना अधिकारी विश्वनाथ दहे, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर उपस्थित होते.

महापौर शिंदे यांनी मनपाचे उत्पन्न व खर्चात मोठी तूट निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. उत्पन्न कमी झाल्याने मोठे प्रकल्प राबवणे शक्य होत नाही. देशपांडे रुग्णालयात कमी दरात चांगली आरोग्य सुविधा मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु रुग्णालयाची इमारत जुनी झाल्याने मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे नवीन इमारत व स्वतंत्र बालरुग्णालय बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी वित्त आयोगाकडून जास्तीत जास्त विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौरांनी केली. हद्दवाढीत समावेश झालेल्या गावांच्या विकासासाठी शासनाने कोणताही निधी दिलेला नाही. त्यासाठी वित्त आयोगाकडून विशेष निधीची आवश्यकता असल्याचे महापौर शिंदे यांनी सांगितले.