आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagar Municipal Corporation Election Process Starts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभागरचनेसह आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाल्याने खर्‍या अर्थाने निवडणुकीचा बिगूल वाजला. पदाधिकारी व विद्यमान नगरसेवकांचे गड शाबूत असले, तरी दहा नगरसेवकांची अडचण झाली आहे.

मनपा सभागृहात सकाळी 11 वाजता आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव ध. मा. कानडे व कक्षाधिकारी अतुल जाधव यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यावेळी पदाधिकारी, नगरसेवक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरक्षण सोडत जाहीर करण्यापूर्वी मनपा इमारतीच्या मागील बाजूस नवीन प्रभागरचना नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. आरक्षण सोडत पाहण्यासाठी एलसीडी स्क्रीनही लावण्यात आला होता.

द्विसदस्यीय पध्दतीने होणार्‍या आगामी निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 9 पैकी 5 जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 18 पैकी 9 जागा नागरिकांच्या मागास महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर सर्वसाधारण 40 पैकी 20 जागा महिलांसाठी राखीव आहेत. एका प्रभागात ‘अ’ व ‘ब’ असे दोन उमेदवार राहणार आहेत. प्रत्येक प्रभागात एक महिला असेल. आरक्षणासह प्रारूप प्रभागरचना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असून 27 ऑगस्टला ती अधिकृतपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात येणार आहेत. सोडत जाहीर होताच राजकीय वतरुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.


प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे :
प्रभाग 1 : अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण : भिस्तबाग महाल, पाइपलाइन रोड, तपोवन परिसर, ढवण वस्ती, कॉटेज कॉर्नर, म्हाडा कॉलनी.
प्रभाग 2 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : निर्मलनगर, लक्ष्मीनगर, सूर्यानगर, तवलेनगर, दसरेनगर, पाऊलबुधे शाळा.
प्रभाग 3 : अ - अनुसूचित जमाती प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : भिस्तबाग चौक, लाल गुलाब कॉलनी, वाणीनगर, यशोदा नगर, पाइपलाइन हडको.
प्रभाग 4 : अ - अनुसूचित जाती प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : नगर-मनमाड हायवे, नागापूर गावठाण, एमआयडीसीजवळील भाग, गणेश चौक.
प्रभाग 5 : अ - अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण: बोल्हेगाव गावठाण, गणेश चौक, चेतना कॉलनी, हनुमाननगर, सावेडी बसस्थानक.
प्रभाग 6 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला: वैदूवाडी, र्शमिकनगर परिसर, वृंदावन कॉलनी, रेणावीकर शाळा, प्रतिभा कॉलनी.
प्रभाग 7 : अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण : संपूर्ण सावेडी गावठाण, बोल्हेगाव रस्ता, वाघमळा, म्हस्के हॉस्पिटल, परिचय हॉटेल, खंडोबा मंदिर.
प्रभाग 8 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : मोरया मंगल कार्यालय, हनुमाननगर, सपकाळ हॉस्पिटल परिसर, कामगार सोसायटी.
प्रभाग 9 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : अशोकनगर, सीआयव्ही कॉलनी, दरबार चौक, दर्गादायरा, गावठाण, इशरत पार्क.
प्रभाग 10 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : गोविंदपुरा, डीएसपी ऑफिस, न्यायालयीन व शासकीय निवासस्थाने, यशवंत कॉलनी.
प्रभाग 11 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : सिटी सव्र्हे ऑफिस, सिंधी कॉलनी, सिव्हिल हडको, पत्रकार वसाहत, मिस्किन मळा.
प्रभाग 12 : अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण : दत्तमंदिर परिसर, स्टेट बँक कॉलनी, प्रेमदान हडको, आकाशवाणी, गायकवाड मळा.
प्रभाग 13 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : शिंदे मळा, फुलारी पेट्रोलपंप, महालक्ष्मी गार्डन, भुतकरवाडी, भिंगारदिवे मळा, बोरुडे मळा.
प्रभाग 14 : अ - अनुसूचित जाती प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : महावीरनगर, गायकवाड कॉलनी, सारडा कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल, सिद्धार्थनगर.
प्रभाग 15 : अ - अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : आरटीओ ऑफिस, तारकपूर बसस्थानक, कराचीवालानगर, महेश चित्रपटगृह, मुस्लिम दफनभूमी, फलटण पोलिस चौकी.
प्रभाग 16 : अ - अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : लालटाकी, हुतात्मा स्मारक, सिद्धिबाग, सर्जेपुरा, हरिजन वस्ती, गवळीवाडा, मंगलगेट परिसर, कोंड्यामामा चौक.
प्रभाग 17 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, नेहरू मार्केट, मोचीगल्ली, तेलीखुंट, जंगुभाई तालीम, कुंभारगल्ली, मोचीवाडा, तोफखाना.
प्रभाग 18 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : सारडा विद्यालय, मिसाळगल्ली, बागडपट्टी, जुने दाणेडबरा, दाळमंडई रस्ता, मंगलगेट, रामचंद्र खुंट, राज चेंबर्स, शेरकर गल्ली.
प्रभाग 19 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : कोठला स्टँड, झेंडीगेट, मोचीवाडा, बूथ हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, नालबंद खुंट, व्यापारी मोहल्ला, सैदू कारंजा, आंबेडकर चौक.
प्रभाग 20 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : आडतेबाजार, दाळमंडई, कापडबाजार, पिंजारगल्ली, माणिक चौक, अर्बन बँक चौक, मोचीगल्ली, देशपांडे दवाखाना.
प्रभाग 21 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : चितळे रोडची दक्षिण बाजू, गौरीघुमट, पटवर्धन चौक, गांधी मैदान, नेता सुभाष चौक, घुमरेगल्ली, तख्ती दरवाजा, आझाद चौक .
प्रभाग 22 : अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण : सातभाई मळा, नालेगाव, दिल्लीगेट, सांगळेगल्ली, अमरधामसमोरील बाजू, नालेगाव हडको.
प्रभाग 23 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : रिमांडहोम, आयुर्वेद कॉलेज, बेग पटांगण, मंगळवारबाजार, विशाल गणपती मंदिर, बारातोटी कारंजा, फुलसौंदर चौक.
प्रभाग 24 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : माळीवाडा वेस, क्लेरा ब्रूस हायस्कूल, जुनी वसंत टॉकिज, बुरूडगल्ली, नगर कॉलेज, चांदणी चौक, माळीवाडा परिसर.
प्रभाग 25 : अ -अनुसूचित जाती प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : नगर-कल्याण रोड दोन्ही बाजू, वाघ मळा, दातरंगे मळा, वारूळाचा मारूती, बागरोजा मळा, पाठक मळा, जाधव मळा, नीलक्रांती चौक.
प्रभाग 26 : अ - अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : वाडिया पार्क, स्वस्तिक बसस्थानक, बुरूडगाव रस्ता व भाजी मार्केट, माळीवाडा दलित वस्ती, कृषी उत्पन्न बाजार समिती.
प्रभाग 27 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर, आगरकर मळा, नवीन टिळक रोड, माणिक नगर, काटवन खंडोबा मंदिर, सन्मान हॉटेल, शिल्पा गार्डन.
प्रभाग 28 : अ - अनुसूचित जाती प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला: रेल्वेयार्ड, लिंकरोड परिसर, गायके मळा, केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, अचानक वस्ती, हॉटेल यश ग्रॅण्ड, इलाक्षी शोरूम, खैरे चाळ.
प्रभाग 29 : अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण : सारसनगर, कानडे मळा, शासकीय तंत्रनिकेतन, आनंदधाम, अवसरकर मळा, केदार वस्ती, ढोर वस्ती, विठ्ठल मंदिर, शांतीनगर.
प्रभाग 30 : अ - सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण : पत्रकार वसाहत, भोसले आखाडा, चाणक्य चौक, विनायकनगर, फुलसौंदर मळा, चंदन इस्टेट, बाबर मळा, चिपाडे मळा, डॉक्टर कॉलनी.
प्रभाग 31 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : आव्हाड मळा, नगर-दौंड रोड, कायनेटिक कंपनी, पांजरापोळ, कोतकर मळा, केडगाव देवी रोड, भूषणनगर, दीपनगर.
प्रभाग 32 : अ - नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : नेप्ती रोड, वैष्णवनगर, एकनाथनगर, रभाजीनगर, भाग्योदय मंगलकार्यालय, जि. प. प्राथमिक शाळा, सुवर्णानगर, खडू कारखाना.
प्रभाग 33 : अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला : केडगाव गावठाण, मोतीबाग, शाहूनगर, हजारे मळा, नगर-पुणे रस्त्याची उत्तर बाजू, केडगाव बायपास, पाच गोडावून.
प्रभाग 34 : अ - अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, ब - सर्वसाधारण : केडगाव देवी मंदिर, मोहिनीनगर, केडगाव दलित वस्ती, अमरधाम, कोतकर मळा, सोनेवाडी रोड, लोंढे मळा, अरणगाव रोड, कांबळे मळा.


हे आले अडचणीत
नवीन प्रभाग रचनेनुसार सध्याच्या वॉर्ड रचनेत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. त्यामुळे सुभाष लोंढे, नितीन जगताप, बाळासाहेब पवार, पोपट बारस्कर, अशोक बडे, अंबादास पंधाडे, सुनील कांबळे, निखिल वारे, विनित पाऊलबुधे व संजय शेंडगे हे विद्यमान नगरसेवक अडचणीत आले आहेत. स्वत:चा वॉर्ड दुसर्‍या प्रभागात, तर दुसर्‍याचा वॉर्ड स्वत:च्या प्रभागात समाविष्ट झाल्याने अनेक नगरसेवकांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.