आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Municipal Tax Inspector Run To Commissioner

कर निरीक्षकांनी घेतली आयुक्तांकडे धाव, मनपा मालमत्ता कर अपहारप्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय दोनमध्ये मालमत्ता करात लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी वसुली लिपिक प्रशांत लोंढे कर निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांना निलंबित करण्यात आले. लोंढे याने अपहार केल्याची लेखी कबुली आयुक्तांकडे दिली, तर शिरसाठ यांनी या प्रकरणात आपल्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असून ती रद्द करावी, अशी मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

शिरसाठ यांनी केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, आपण जून २०१४ पासून कर निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. त्यावेळी लिपिक लोंढेे वारंवार कामावर गैरहजर रहात होते. लोंढे कामावर हजर होईपर्यंत त्यांची असाधारण रजा करण्याबाबतचा प्रस्ताव उपायुक्तांना जानेवारी २०१५ मध्ये दिला होता. त्यानंतर लोंढे २३ ऑक्टोबर २०१५ रोजी कामावर रुजू झाले. त्यांनी केलेला अपहार मी कर निरीक्षक पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी म्हणजे सन २०१२ पासूनचा आहे. िवशेष म्हणजे हा अपहार मीच उघडकीस आणला आहे.

वाॅर्ड क्रमांक १३ मधील एक मालमत्ताधारक कर भरलेली पावती घेऊन माझ्याकडे आले. त्यांना मीच करमूल्य निर्धारण अिधकाऱ्यांकडे घेऊन गेलो. त्यानंतर हा अपहार झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे याप्रकरणी माझ्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असून ती रद्द करावी, अशी मागणी शिरसाठ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मी अपहार केला...
मालमत्ता करात अपहार झाल्याचे मला मान्य आहे. अपहाराची रक्कम भरण्यासाठी मला ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत द्यावी. तत्पूर्वी मला पुन्हा सेवेत घेण्यात यावे, अशी लेखी कबुली मागणी अपहारप्रकरणी निलंबित वसुली लिपिक प्रशांत लोंढे यांनी आयुक्तांकडे केली आहे.