आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Bhausaheb Wakchaure, MP, Mahayuti, Divya Marathi

महिला अधिकार्‍यांची बदली करा,महायुतीच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सुरक्षा रक्षकांची फिर्याद नोंदवणार्‍या पोलिसांनी शिवसैनिकांची फिर्याद नोंदवण्यास नकार दिल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. निवडणुकीशी संबंधित काम नि:पक्षपातीपणे पार पडण्यासाठी मतदारसंघातील दोन महिला अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली.


वाकचौरे यांना सोमवारी (10 मार्च) संगमनेरमध्ये शिवसैनिकांनी मारहाण केली. वाकचौरे यांना त्यांच्या दोन सुरक्षा रक्षक व पोलिस निरीक्षकांसमोरच मारहाण झाल्याने मोठा गोंधळ उडाला. महायुतीच्या पदाधिकार्‍यांची व शिवसैनिकांची फिर्याद घेण्यास नकार देणार्‍या पोलिस निरीक्षक श्याम सोमवंशी यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाल्याने त्यांनी महायुतीच्या काही कार्यकर्त्यांवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा नोंदवला. पोलिस यंत्रणेवरचा विश्वास उडालेल्या व अटकेतील शिवसैनिकांनी न्यायालयात पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी मारहाण केल्याची तक्रार केली. वैद्यकीय तपासणीत ही बाब स्पष्ट झाली. आरोपीचे वकील र्शीराम गणपुले यांनी पोलिस दबावाखाली काम करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांशी संबंधित असणार्‍या दोन महिला पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली.


या दोन्ही अधिकार्‍यांमार्फत आचारसंहितेच्या काळात निवडणुकीच्या कामात व्यत्यय होण्याची शक्यता आहे. या अधिकार्‍यांकडून सामान्यांना न्याय मिळू शकणार नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यासंदर्भात योग्य अहवाल आयोगाकडे पाठवलेला नसल्याचे या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.


यांनी केली बदलीची मागणी
शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख अँड. दिलीप साळगट, नगरसेवक कैलास वाकचौरे, भाजपचे नगरसेवक राधावल्लभ कासट, अँड. श्रीराम गणपुले व ज्ञानेश्वर कर्पे, रावसाहेब गुंजाळ, अप्पा केसेकर, राजेश चौधरी, मुरारी देशपांडे, अँड. गौरव मालपाणी, शिवाजी लष्करे, आसिफ तांबोळी, डॉ. भानुदास डेरे, दशरथ दारोळे, विठ्ठल शिंदे, परिमल देशपांडे, ज्ञानेश्वर कांदळकर, जालिंदर लहामगे, योगेश बिचकर, दिनेश फटांगरे.

यांच्याविरोधात केली तक्रार
सुनीता साळुंके-ठाकरे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे पती काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहत होते. देवयानी पाटील या संगमनेर शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक आहेत. शहर पोलिस ठाण्यात दुसर्‍या क्रमांकाच्या पदावर त्या आहेत. विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे स्वीय सहायक अभयकुमार निर्मळ हे त्यांचे पती आहेत.