आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, BJP, Vitthal Chate, Divya Marathi

..त्यांची नाराजी दूर करू,भाजप जिल्हा संघटनमंत्री विठ्ठल चाटे यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कुणाची नाराजी राहणार नाही. सर्वांची नाराजी आम्ही दूर करू, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे नगर जिल्हा संघटनमंत्री विठ्ठल चाटे यांनी दिली.केशरगुलाब मंगल कार्यालयात गुरूवारी झालेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत चाटे बोलत होते. खासदार दिलीप गांधी, शहराध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष अनिल गट्टाणी, महिला आघाडीच्या प्रमुख गीता गिल्डा, सुनील रामदासी, बाळासाहेब पोटघन, अनंत जोशी, गुलशन जग्गी आदी यावेळी उपस्थित होते. चाटे म्हणाले, देशभर भाजपची लाट आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरातमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. देशात एनडीएचे सरकार नक्कीच येईल.


दिलीप गांधी यांनी विकासाचा पायंडा घातला आहे. विकास काय असतो ते त्यांनी दाखवून दिले. हे कुण्या येड्यागबाळ्याचे काम नाही. निधी आणण्याची ताकद गांधी यांच्यात आहे. मी नरेंद्र मोदी आहे, असे समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे. भाजप हा सामान्यांचा पक्ष आहे. सामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे. पक्षात कुणाचीही नाराजी राहणार नाही. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठय़ा ताकदीने गांधी यांना निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.


दिलीप गांधी म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून मी मोठा झालो. नेतृत्व करण्याची संधी मला संघटनेने दिली.संघटनेमुळे जवळून देश पाहण्याची संधी मिळाली. लोकांनी अनेकदा मला प्रलोभने दाखवली. मात्र, मी ठाम राहिलो.आगरकर म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक वेगळी आहे. निव्वळ मोदी लाट आहे, असे म्हणून चालणार नाही. कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद आहे. 205 बूथरचनेचे काम पूर्ण झाले असून उर्वरित बूथरचनेचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.