आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Dilip Gandhi, Narendra Modi, BJP, Divya Marathi

अन् ‘त्यांच्या’ चेहर्‍यावर झळकले समाधान..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ मोदी यांची विराट जाहीर सभा शनिवारी सुरळीत पार पडली, अन् गेल्या तीन दिवसांपासून डोळ्यात तेल घालून कडेकोट बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या जवळपास साडेबाराशे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी अखेर सुटकेचा सुस्कारा सोडला.गेल्या तीन दिवसांपासून सभेच्या ठिकाणाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके गुरुवारी (10 एप्रिल) सायंकाळपासून नगरमध्ये तळ ठोकून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त होता. जळगाव, नागपूर जिल्ह्यांसह नाशिक ग्रामीण असे जवळपास बाराशे पोलिस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते. मैदानाशेजारील इमारतींचे छत ताब्यात घेण्यात आली होती. बॉम्बशोधक आणि श्वानपथकाने दोन दिवसांपासून मैदानाची तपासणी केली. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त गुजरात पोलिस, राज्य गुप्तवार्ता विभाग, एनएसजीची स्वतंत्र यंत्रणा तैनात होती. मुख्य व्यासपीठ व जवळच्या परिसरात गुजरात पोलिस व एनएसजीचे पथक तैनात होते. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांची सर्व व्यवस्था केली होती.


तीन तास ट्रॅफिक जाम
मोदींची सभा संपल्यानंतर निरंकारी भवन मैदानावर आलेले कार्यकर्ते व नागरिक यांची एकच गर्दी उसळली. सकाळपासून मैदानाकडे लोटत असलेला लाखोंचा जनप्रवाह एकाच वेळी परतीच्या दिशेने निघाला. त्यामुळे सिव्हिल हडको, प्रोफेसर कॉलनी, डीएसपी चौक ते पत्रकार चौक, मनमाड रोडवर एमआयडीसीपर्यंत शहराबाहेर जाणारी एक बाजू तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झालेली होती. ही कोंडी सुटण्यासाठी पुन्हा पोलिसांवर ताण आला.