आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Hailstorm, Kopergaon, Divya Marathi

कोपरगावात पुन्हा गारपीट; रस्त्यावर अर्धा फूट थर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील चासनळी, मंजूर, हंडेवाडीसह चौदा गावांना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास मोसंबीच्या आकाराच्या गारा व वादळी पावसाने झोडपून काढले. मंजूर-हंडेवाडी फाट्यावर अर्धा फूट गारांचा थर साचला होता. तालुक्यात 4 मार्चलाही मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली होती.


मंजूर, हंडेवाडी, चासनळी, वडगाव, बक्तरपूर, सांगवी भुसार, धामोरी, सोमठाणे, दहिवडी, कारवाडी, वेळापूर, सुरेगाव, कोळपेवाडी या तेरा गावांना गुरूवारीही गारपिटीने झोडपून काढले. जिल्हाधिकारी अनिल कवडे, आमदार अशोक काळे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. वेळापूर-हंडेवाडी फाटा रस्त्यावर बर्फाच्या लाद्यांप्रमाणे गारांचा खच साचल्याने चासनळीच्या पुढे सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले सुरक्षा अधिकारी प्रकाश डुंबरे यांचे मदत पथक तातडीने तेथे पाठवले.


गेल्या आठवड्यात निसर्गाच्या प्रकोपातून सुटलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांना गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या शेतकर्‍यांपुढे आता वीजबिले, पाणीपट्टी, शैक्षणिक शुल्क, मुला-मुलींचे विवाह, दवाखान्याचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न पडला आहे. गारांच्या तडाख्यात गहू, हरभरा, कांदे, ऊस, तसेच फळझाडांचे एकही पान राहिले नाही.


माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहेर यांच्या वस्तीजवळील आहेर चारीस दहा वर्षांत आले नव्हते इतके पाणी गुरुवारी झालेल्या पावसाने आले. गारपिटीत गाई, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, वासरं, कोंबड्या जखमी झाल्या आहेत.