आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi, Model Code Of Conduct

मागील दीड महिन्यात जिल्ह्यात 1400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आचारसंहिता कालावधीत धडक कारवाई करत जिल्हा पोलिस प्रशासनाने लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. गेल्या दीड महिन्यात 1400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 47 जणांना तडीपार करण्यात आले आहे. 21 गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आचारसंहिता कालावधीत राज्यात सर्वाधिक कारवायात नगर जिल्हा पोलिस प्रशासन अव्वल ठरले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जानेवारीपासूनच विस्तृत आराखडा तयार केला होता. आचारसंहिता लागू होताच या आराखड्याची अंमलबजावणी सुरू झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे स्वत: दररोज या अंमलबजावणीचा आढावा घेत होते. जिल्ह्यातील 1393 जणांविरूद्ध फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 107, 109, 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जानेवारीपासून आतापर्यंत 28 जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले, तर 47 जणांवर तात्पुरत्या तडीपारीची कारवाई करण्यात आली. 21 गावठी कट्टे, 12 तलवारी, 3 कोयते, 3 सुरे, 2 चॉपर व 36 जिवंत काडतुसे जप्त करून 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कालावधीत 3787 जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. 36 फरार आरोपींना, तर उपकारागृहातून पळालेल्या एका कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.


जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूबंदीच्या 313 केसेस करून 324 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 13 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2665 परवाना शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहेत, अशी माहिती अधीक्षक शिंदे यांनी दिली.


तक्रारींसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय क्रमांक (मतदानाच्या दिवशी)
अकोले - 2323171, संगमनेर - 2323118, शिर्डी - 2323124, कोपरगाव - 2323108, र्शीरामपूर - 2323127, नेवासा - 2323028, शेवगाव-पाथर्डी - 2323121, राहुरी - 2323058, पारनेर - 2323119, नगर - 2323038, र्शीगोंदे - 2323172, कर्जत-जामखेड - 2323158. (नगर वगळता इतर ठिकाणाहून फोन करताना वर दिलेल्या क्रमांकांपूर्वी 0241 हा कोड टाकावा.)