आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, MNS, Ahmednagar Municipal Corporation

स्थायी सभापतिपदासाठी मनसे, अपक्षांची फिल्डिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी अपक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकाने फिल्डिंग लावली आहे. विभागीय आयुक्तांकडून सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित होताच सभापतिपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


मनपाची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थायी समितीसाठी 15 फेब्रुवारीला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत 16 सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी व अपक्ष विकास आघाडीचे कुमार वाकळे व उषा ठाणगे या दोन अपक्षांसह मनसेचे किशोर डागवाले यांचा समावेश आहे. सदस्य निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून निश्चित होणार्‍या पुढील सर्वसाधारण सभेत स्थायी सभापतीची निवड होणार आहे. प्रस्ताव पाठवून दहा दिवस उलटले, तरी सभेची तारीख निश्चित झालेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होईल. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मनसेचे डागवाले व राष्ट्रवादीच्या गटातील अपक्ष नगरसेविका उषा ठाणगे दावेदार असल्याची चर्चा आहे.


महिला बालकल्याणसाठीही रस्सीखेच
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठीही मोठी रस्सीखेच सुरू आहे. या पदासाठी काँग्रेसच्या रुपाली वारे, राष्ट्रवादीच्या मंगला गुंदेचा, राष्ट्रवादीच्या गटातील अपक्ष नगरसेविका नसीम शेख यांच्या नावांची चर्चा आहे.