आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Music Program Liked To Audiences

पाश्चिमात्त्य व इराणी बाबाप्रेमींच्या गायन-वादनाने श्रोते मंत्रमुग्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये, विविध भाषांतील गाणी व सरते शेवटी प्रसिद्ध संगीतकार बिदू यांनी म्हटलेल्या गाण्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते अवतार मेहेरबाबांच्या जन्मोत्सवाचे.झेंडीगेट येथील अवतार मेहेरबाबा केंद्रामध्ये झालेल्या जन्मोत्सवात इराणी व पाश्चिमात्त्य बाबाप्रेमींचे गायन व वादन झाले. इराणसह आफ्रिका, सर्बिया, रशिया, युरोप, लंडन, स्वीडन व इस्त्राएलमधील भाविकांनी त्यांच्या भाषेत भजने, गाणी सादर केली. यावेळी नगरकर रसिक व मेहेरप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


झारा गाझी, होययार (इराण), टेड ज्ॉक्सन, मार्गी ग्टाक (अमेरिका), टॉस्मिन (साऊथ आफ्रिका), मिखाइल (इस्त्राएल), अलेक्झा व गायसन (रशिया), संगीतकार बिदू, रॉबीन (अमेरिका), कॅरेरा (इटली) टेक्स अली (कॅलिफोर्निया), सहाना, मोहम्मदव सिमरण, शहनाज, मसूद, मोहेरदास (इराण) यांनी हा कार्यक्रम सादर केला. ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये’ या ‘कुर्बानी’ चित्रपटातील गाण्यासह अनेक गीतांना संगीत देणारे बिदू यांनी अखेरचे गाणे गायले. त्यांना पत्नी सुजी यांनी साथ दिली. श्रोत्यांनी या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.