आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Narendra Modi, Sharad Pawar, Lok Sabha Election

नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या सभांसाठी प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांच्या सभा व्हाव्यात, यासाठी उमेदवारांनी फील्डिंग लावली आहे. भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधी हे नरेंद्र मोदींच्या, तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे हे शरद पवार यांच्या सभांसाठी प्रयत्नशील आहेत.


सध्या देशभरात मोदी लाट आहे. या लाटेचा फायदा घेण्यासाठी मोदी यांची एक सभा नगरमध्ये घेण्यासाठी खासदार गांधी आटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात 9 एप्रिलला मोदी यांची नगरमध्ये सभा होण्याची शक्यता आहे. सुषमा स्वराज, शहानवाज हुसेन यांच्याही सभा आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. मागच्या निवडणुकीत शेवगाव येथे लालकृष्ण अडवाणी यांची सभा शेवटच्या टप्प्यातच झाली होती. त्याचा मोठा फायदा गांधी यांना झाला होता. पाथर्डी परिसरात गोपीनाथ मुंडे यांची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांसाठी राष्ट्रवादीचे नियोजन सुरू आहे. 22 किंवा 23 मार्चला त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. 18 मार्चला गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पारनेर व श्रीगोंद्यात सभा होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्या सभा घेण्याचे नियोजन आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्याही सभा व्हाव्यात, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे प्रचारामध्ये अद्याप रंगत आलेली नाही.