आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, National Highway Work, Sarvatra Satyanarayan

राष्ट्रीय महामार्ग तीन महिन्यांत पूर्ण करा,सर्वत्र सत्यनारायण यांचे अधिकार्‍यांना निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना आपण शासकीय यंत्रणेला दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री सर्वत्र सत्यनारायण यांनी दिली.शासकीय विर्शामगृहात झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर सत्यनारायण पत्रकारांशी बोलत होते. या वेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कार्यकारी अभियंता डी. यू. महाजन उपस्थित होते. नाशिक-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील 25 कि.मी. सिन्नर बाह्यवळण रस्ता चौपदरीकरणाचे काम बीओटी तत्वावर मंजूर असून, लवकरच सुरू होणार आहे. खेड (जि. पुणे) ते सिन्नर (जि. नाशिक) या टप्प्यातील 135 कि.मी.च्या चौपदरीकरणाचे बाराशे कोटी खर्चाचे काम सुरू झाले आहे. सिन्नर-शिर्डी-नगर मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 म्हणून जाहीर झाला असून, तो लवकरच केंद्राकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. भूसंपादनातील अडचणींवर मार्ग काढण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांना दिल्याचे मंत्र्यांनी सांगितले.


सिन्नर-शिर्डी मार्गाच्या कामाची चौकशी
सिन्नर ते शिर्डी या 53 कि.मी. रस्त्यासाठी 60 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली. परंतु काम अर्धवट असल्याचे वाकचौरे यांनी निदर्शनास आणून दिले.त्याची समिती नेमून चौकशी केली जाईल. ठेकेदार, दोषी अधिकार्‍यांवरही कारवाई करू. सर्वत्र सत्यनारायण, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री


425 कोटींची कामे मंजूर