आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Sharad Pawar Will Inaugurats Rayat Science Exhibition

रयत विज्ञान परिषदेचे उद्घाटन होणार पवारांच्या हस्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - रयत शिक्षण संस्था आणि होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी रयत विज्ञान परिषद 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत येथील रयत संकुलात आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
माध्यमिक शाळांच्या पातळीवर होणारी ही पहिली परिषद असून माध्यमिक शाळेतील 600 विद्यार्थी वैज्ञानिक उपकरणे व खेळणी प्रदर्शित करणार आहेत. पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अँड. रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, ‘निर्लेप इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष रामचंद्र भोगले, रयतचे उपकार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य अरविंद बुरुंगले, सहसचिव प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड उपस्थित राहणार आहेत.


शुक्रवारी एसएनडीटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रपाठक डॉ. सत्यवती राऊत, प्रा. वीणा देशमुख, प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, डॉ. सुधीर कुंभार यांची व्याख्याने होतील. शनिवारी (1 मार्च) डॉ. नरेंद्र डी. देशमुख, विनोद सोनवणे, पुणे येथील सी-मॅटचे शास्त्रज्ञ भारत काळे, संचालक डॉ. दिनेश अमळनेरकर यांची व्याख्याने होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. सागर देशपांडे व प्रमुख वक्ते म्हणून कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर असतील. डॉ. विवेक सावंत, जयू भास्कर, डॉ. सुनील देवधर, माधव गोखले आदी मान्यवरांचे विचार ऐकण्यास मिळणार आहेत.
रविवारी प्राचार्य बुरुंगले यांचे व्याख्यान होईल. प्राचार्य गायकवाड अध्यक्षस्थानी असतील. समारोपास ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे असतील.