आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar News In Marathi, Tourist Spots, Divya Marathi, Nizamshahi

अनुभवा गारवा पाच शतकांपूर्वीच्या निझामशाही महालातला...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सूर्य आग ओकत असताना पाचशे वर्षांपूर्वी निझामशाहीत बांधलेले महाल मात्र एखाद्या वातानुकूलित कक्षासारखे थंड आहेत. भरदुपारी या महालांत गेला, तरी तुम्हाला या शीतलतेचा अनुभव घेता येईल.

सध्या कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होते, पण सावेडीतील हश्त-बेहश्त महालात मात्र थंड हवेच्या झुळका वाहत असतात. या झुळका अंगावर घेत अनेक जण तिथे विश्रांती घेत पहुडलेले दिसतात. केवळ हश्त-बेहश्त महालाचे हे वैशिष्ट्यही, नगर-सोलापूर रस्त्यावरील फराहबख्क्ष महाल, चांदबीबीचा महाल व अन्य निझामशाहीकालीन वास्तूतही हा अनुभव येतो.

नगर हे उष्ण व कोरड्या हवामानाचे शहर. उन्हाळ्यात सूर्याची दाहकता कमी व्हावी म्हणून निझामशाहीत दोन जलमहाल बांधण्यात आले. सध्या भिस्तबाग म्हणून ओळखल्या जाणा-या भागात नगरचा संस्थापक अहमद निझामशाहने पहिला जलमहाल बांधला. त्याच्या मुलगा बु-हाणशहाने पुढे त्याचा विस्तार केला. अष्टकोनी तलावाच्या मध्यभागी असलेला अष्टकोनी महाल, तलावाशेजारी हमामखाना (शाही स्नानगृह) आणि सभोवताली आकर्षक उद्यान, ज्यात सुवासिक फुलांच्या ताटव्यांबरोबर गाणारे पक्षीही होते. तलावासाठी वडगाव आणि शेंडीच्या तलावातून खापरी नळातून पाणी आणले गेले होते. बादशहा इथे विश्रांतीसाठी येत असे. उन्हाळ्याच्या दिवसांतही इथे नंदनवनाचा अनुभव येई.

या महालांच्या बांधकामासाठी अतिशय उच्च दर्जाचा चुना वापरण्यात आला आहे. सूर्यकिरणांची उष्णता रोखण्याचे काम भिंतीला असलेला चुन्याचा गिलावा करते. या महालांची अष्टकोनी रचना उत्तम वायुव्हिजनाला मदत करते. आता हिरवळ नसली आणि तलाव कोरडा असला तरी या वास्तूची अंगीभूत रचना महालाचा अंतर्भाग थंड ठेवते.

काळाच्या कराल दाढांतून बचावत हा महाल अजून उभा असला तरी देखभालीअभावी त्याची रया गेली आहे. प्रेमवीरांनी आपली नावे लिहून त्याचे सौंदर्य नष्ट केले आहे. लाकडी तुळया लांबवल्याने महाल खिळखिळा झाला आहे. शाही हमामखान्याचा उकिरडा झाला आहे. जिथे गुलाबाचे ताटवे होते, तिथे सिमेंट काँक्रीटचे सांगाडे उभे राहू लागले आहेत...

पुढे वाचा ....