आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर-मनमाड रस्त्यावर झालेल्या जीप अपघातात दोघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे भाविकांच्या महिंद्रा मॅक्सला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दोनजण जागीच ठार झाले, तर 7 जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. परमेश्वर रमेश बागूल (25) व सुखदेव परशराम जाधव (60, दोघे दुसाने, ता. साकी, जि. धुळे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.


दुसाने येथून हे भाविक बुधवारी (12 फेब्रुवारी) मध्यरात्री अकरा वाजता र्शीवीर म्हसोबा (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे नवस फेडण्यासाठी निघाले होते. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ त्यांच्या महिंद्रा मॅक्सला (एमएच 18, एस 275) अज्ञात वाहनाची जोराची धडक बसली. यात वाहनचालक परमेश्वर बागूल (25) व सुखदेव जाधव (60, दुसाने) हे दोघे जागीच ठार झाले. अन्य सातजण जखमी झाले.


पोलिसांनी जखमींना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मखन होडगर व यमाबाई लकडे यांना शिर्डी येथे हलवण्यात आले. तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप गायकवाड, मधुकर सुरवसे करीत आहेत.
राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ नेहमी अपघात होतात. दोन वर्षांपूर्वी 6 साईभक्त याच जागेवर ठार झाले होते. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


जखमी भाविक
जखमींमध्ये मखन नारायण होडगर (60, दुसाने), यमाबाई लक्ष्मण लकडे (45, ब्रह्मपूर, खांडवा, मध्यप्रदेश), ममाबाई यशवंत होडगर (35, ब्रह्मपूर), नाना लहानू अहिरे (30), वाल्हाबाई राघू लकडे (60), अनसूयाबाई नाना लकडे (30), शैला कान्हू कोळेकर (40, चारही भागापूर, ता. साक्री, जि. धुळे) यांचा समावेश आहे. शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व राहुरी ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

डंपरच्या धडकेने आमची गाडी फरपटत नेली..
एक मोठा डंपर आमच्या वाहनावर धडकला. यामुळे आम्हाला काहीच सुचेनासे झाले. डंपरने आमची गाडी फरपटत नेली. अपघातात एकही वाचणार नाही, अशी भीती होती. आम्ही म्हसोबाच्या दर्शनासाठी चाललो होतो. आमच्याबरोबर पाच गाड्या होत्या. उर्वरित चार गाड्यांतून भाविक पुढे गेले होते. नाना आहिरे, जखमी भाविक.