आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एनआरएचएम’चा कार्यक्रम व्यवस्थापक जगाते बडतर्फ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (एनआरएचएम) कार्यक्रम व्यवस्थापक गजानन जगाते यांच्यावर असमाधानकारक कामाचा ठपका ठेवून त्यांना बडतर्फ करण्यात आले. हा आदेश मुंबई येथील अभियानाच्या संचालकांनी काढला असल्याची माहिती सोमवारी समजली.

जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाशेजारीच राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग आहे. कामातील हलगर्जीपणाबाबत जगाते यांना यापूर्वी चार-पाच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अलिकडेच या विभागात एक ‘नाजूक’ प्रकरण घडले. त्यामुळे धास्तावलेल्या कर्मचार्‍यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी के. आर. खरात यांच्याकडे तक्रार केली होती. हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्यापर्यंत गेले. खरात यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन तीन दिवसांत खुलासा करावा, अशी नोटिस जगाते यांना बजावली होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने 30 मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. कार्यक्रम व्यवस्थापकाची नेमणूक थेट राज्य शासनाकडून होत असल्याने बडतर्फ करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत. वेळोवेळी नोटिसा बजावूनही कामात सुधारणा न दिसल्याने खरात यांनी आतापर्यंत आलेल्या सर्व तक्रारींचा अहवाल मुंबई येथे अभियान संचालकांकडे पाठवला होता. याची गंभीर दखल घेत असमाधानकारक कामाचा ठपका ठेवत अभियान संचालकांनी जगाते यांना बडतर्फ केले.