आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त पॅगोचालकांविरुद्ध कार्यकर्त्यांची गांधीगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बेशिस्तपणे धावणार्‍या शहरातील पॅगोचालकांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी गांधीगिरी केली. 61 पॅगोचालकांना गुलाबांची फुले देऊन त्यांचा उपरोधात्मक सत्कार करण्यात आला.

शहरात अवैध रिक्षा व पॅगोंचा सुळसुळाट झाला आहे. प्रवासी मिळवण्याच्या साठमारीत हे चालक वेगात व बेशिस्तपणे रिक्षा चालवून अपघातांना निमंत्रण देतात. रस्त्याच्या दोन्ही बाजू रिक्षाचालक व्यापतात. अचानक कुठेही अँपेरिक्षा थांबवल्या जातात. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनचालकांना मोठा त्रास होतो. अँपेचालकांची नागरिकांशी हुज्जत रोजचीच झाली आहे. माळीवाडा बसस्थानक, दिल्ली दरवाजा, नीलक्रांती चौक, लालटाकी, प्रेमदान चौक आदी परिसरात रस्त्यांवरच अँपे थांबवल्या जातात. सिग्नलच्या ठिकाणी पुढे जाणार्‍या वाहनांना अडथळा होईल, अशा पद्धतीने अँपेरिक्षा उभ्या केल्या जातात. वाहतूक पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असतो. प्रवाशांना रस्त्याच्या मध्येच उतरवले जाते.

या बेशिस्तपणाचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी 61 अँपे व रिक्षाचालकांना मंगळवारी गुलाबांची फुले देत गांधीगिरी केली. प्रदेश काँग्रेसच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे संयोजक संजय मोरे, छत्रपती ग्रूपचे अध्यक्ष संग्राम पाटील, राजे ग्रूपचे अध्यक्ष निखिल गवळी, अल्पसंख्याक आयोगाचे सय्यद शाकीर यांच्या नेतृत्वाखाली माळीवाडा बसस्थानक ते सावेडी नाकादरम्यान हे आंदोलन करण्यात आले. अक्षय जवंजळे, सागर जाधव, संकेत कोल्हे, वैभव लंगोरे, गौरव देशपांडे, प्रणित कोडम, अभिजित सैंदाणे, अजय अन्नम, विजय अन्नम, सनी सोनवणे, अभिषेक बुरा, प्रसाद चिलवर, प्रसाद र्शीगादी, योगेश काळे, सागर काळे, नितीन वाकळे, विशाल फुलसौंदर, सिद्धार्थ साळवे, नूर शेख, जमीर शेख, बाबू शेख, किरण दहिफळे, ओंकार कुलकर्णी, दीपक जोशी, अनिल गिते, प्रशांत भिंगारदिवे, वैभव कटारिया आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.