आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Painter Pic Selected For National Exhibition

नगरचा चित्रकार प्रमोद जगतापच्या "रुसवा' चित्राची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील चित्रकार प्रमोद जगताप याने काढलेल्या "रुसवा' या चित्राची द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत १७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. देशभरातून निवडलेल्या दर्जेदार चित्रांमध्ये प्रमोदच्या चित्राची निवड झाली आहे.
प्रमोदच्या चित्रांना यापूर्वी जॉन फर्नांडिस अवॉर्ड फॉर बेस्ट पेंटिंग तसेच व्ही. व्ही. ओक बेस्ट पोर्ट्रेट अवॉर्ड या राष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक पृथ्वीराज तौर, डॉ. आ. ह. साळुंके, खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप, गिरीश अहुजा, ऐ. के. रघू, जुल्फेश शहा आदी मान्यवरांचे प्रत्यक्ष व्यक्तीचित्रण त्याने केले आहे.
ऑइल कलर, अॅक्रेलिक, जलरंग, ऑईल पेस्टल, सॉफ्ट पेस्टल, चारकोल आदी विविध माध्यमांचा वापर करून मनोवेधक चित्र रेखाटण्यात प्रमोदची हातोटी असून हेच त्याच्या चित्राचे वैशिष्ट्य आहे.
विविध विषयांवरील रेखाटने, पुस्तकांची मुखपृष्ठे अशी विविध कामेही त्याने केली आहेत. तो उत्तम गायकही असून आनंद गायकवाड यांच्याकडे शास्त्रीय संगिताचे धडे गिरवत आहे.