आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर, पारनेर पाथर्डी तालुक्यात ११४ वनराई बंधाऱ्यांचे काम पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उपविभागीयकृषी विभागांतर्गत नगर, पारनेर पाथर्डी तालुक्यात कृषी विभाग लोकसहभागातून ११४ वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले असून ११९ बंधाऱ्यांचे काम प्रगतिपथावर आहे.
कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक कृषी सहायकांकडून १० वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लोकसहभागातून हे बंधारे पूर्ण करावयाचे आहेत.
प्रत्येक बंधाऱ्यातून एक हेक्टर क्षेत्राचे सिंचन संरक्षित करण्याचे नियोजन आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मृद जलसंधारण कामांना वनराई बंधाऱ्यांची जोड देऊन लोकसहभाग वाढवताना पाण्याच्या वापराबाबतही जनजागृती करण्याचे धाेरण अवलंबण्यात आले आहे. या उपक्रमात जलयुक्त शिवार अभियानासह यात सहभागी नसलेल्या सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यात ७१ वनराई बंधारे पूर्ण झाले असून ८२ बंधारे प्रगतिपथावर आहेत. पाथर्डी तालुक्यात २४ वनराई बंधारे पूर्ण झाले असून २७ प्रगतिपथावर आहेत. नगर तालुक्यात १९ बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून १० बंधारे प्रगतिपथावर आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह ग्रामस्थांनी वनराई बंधाऱ्यात जलपूजन केले. रामदास दरेकर, विनायक लगड, सदाशिव पठारे, बाळासाहेब पठारे, दत्ता थोरात, विक्रम रणदिवे आदी यावेळी उपस्थित होते.

उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह ग्रामस्थांनी वनराई बंधाऱ्यात जलपूजन केले. यावेळी रामदास दरेकर, विनायक लगड, सदाशिव पठारे, बाळासाहेब पठारे आदी उपस्थित होते. छाया-समीर मन्यार