आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटमुळे लावला पोलिसांनी चोरीचा छडा, डॉ. संजय आसनानी यांच्या हॉस्पिटलमधील चोरी प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरमधील दंत चिकित्सक सर्जन डॉ. संजय आसनानी यांच्या क्लिनिकमधून लॅपटॉप दंत चिकित्सेसाठी लागणाऱ्या साधनांची चोरी झाली. त्यांनी पोलिसांत याबद्दल अर्जही दिला, पण पोलिस लवकर गुन्हा दाखल करून घेत नव्हते. शेवटी डॉ. आसनानी यांनी मुख्यमंत्री पोलिसांना उद्देशून याबद्दल ट्विट केले. त्यानंतर मात्र पोलिसांची चक्रे वेगात हलली. त्यांनी गुन्हा दाखल करून चाेर मुद्देमालही पकडला. सोशल मीडियाच्या योग्य वापरामुळे हे घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
डॉ. आसनानी यांचे तारकपूर भागात दंत चिकित्सेविषयक हॉस्पिटल आहे. त्यांच्या क्लिनिकमधून ३१ मे रोजी लॅपटॉप दंत चिकित्सेसाठी लागणाऱ्या स्टेनलेस स्टीलच्या साधनांची चोरी झाली. सर्व मुद्देमाल सुमारे ७० हजारांचा होता. ही चोरी झाली अन् त्याचबरोबर त्यांच्या हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी आदिती ब्रह्मेही गायब झाली. डॉ. आसनानी यांना तिनेच या वस्तू नेल्याची खात्री होती. त्यांनी दोन जून रोजी तोफखाना पोलिसांत तक्रारीचा अर्ज दिला. त्यावर जून रोजी पोलिस निरीक्षकांनी याबाबत पोलिसांनी चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचा आदेशही दिला. पण, त्यावर काहीच कारवाई होत नव्हती. संबंधित आरोपी नगरमध्येच राहत होती. डॉ. आसनानी यांची तिचे घरही दाखवण्याची तयारी होती पण पोलिस कारवाई करत नव्हते. शेवटी डॉ. आसनानी १४ जून रोजी मुख्यमंत्री नगर पोलिसांच्या नावाने ट्विट केले.

त्यात सर्व कैफियत मांडली. त्यानंतर २२ जून रोजी त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंग वधवा यांनीही मुख्यमंत्री पोलिस महानिरीक्षकांच्या नावाने ट्विट केले. त्यानंतर डॉ. आसनानी यांनी पोलिस उपअधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर चक्रे वेगात फिरून पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला. दरम्यान, आरोपी आदिती लातूरला निघून गेली होती. पोलिसांनी तिला तेथे जाऊन ताब्यात घेतले. तिने लगेच गुन्हा कबूल केला. लॅप टॉप तर तिच्याचकडे होता. पण, दंतचिकित्सेची साधने तिने एका भंगारवाल्याला अवघ्या ७० रुपये किलोने विकली होती. त्यानेही या साधनांचे काय करायचे, हे समजल्याने तशीच ठेवून दिली होती. ती सर्व त्याने पोलिसांना काढून दिली. ३१ मे रोजी चोरी झाल्यानंतर जवळ-जवळ २६ दिवसांनी गुन्हा नोंदवून एक महिन्याने चोर पकडला. एक जुलै रोजी आदितीला अटक झाली. विशेष म्हणजे, चोर कोण हे माहिती असूनही इतका विलंब लागला. हा गुन्हा उघडकीस येण्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणीभूत ठरला.
 
स्वत:चे हितही आरोपीस कळले नाही...
पोलिस कारवाई करत नसताना डॉ. आसनानी आरोपीच्या संपर्कात होते. त्यांनी तिला दंत चिकित्सेच्या साधनांचे जाऊ दे, पण लॅपटॉपमधील फक्त हार्ड डिस्क परत दे, अशी अनेकदा विनंती केली. इतकेच नव्हे, तर त्यासाठी पैसेही मोजण्याची तयारी दाखवली होती. शिवाय ते तिला समजावत होते, की तिच्या नावाने गुन्हा दाखल झाला, तर तिचे करियर संकटात येईल, पण आरोपी आदिती बधली नाही, ती आपल्याकडे काहीच नाही, असे सांगत राहिली.
बातम्या आणखी आहेत...