आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : टोळीकडून पोलिसांनी सहा मोटारसायकली हस्तगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : नेवासे तालुक्यातील सोनईच्या माजी सरपंचाच्या चोरीस गेलेल्या बुलेट मोटारसायकलीचा तपास करताना पोलिसांनी सहा मोटारसायकली हस्तगत केल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत 6 लाख रुपये आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सोनई, राहुरी नागापूर एमआयडीसी परिसरातून गाड्या चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण शिंदे यांनी ही कामगिरी केली. 
 
सोनईचे माजी सरपंच राजेंद्र बोरुडे यांची सिल्व्हर रंगाची बुलेट गेल्या आठवड्यात घरासमोरुन चोरीला गेली. सहायक निरीक्षक शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. याप्रकरणी भाऊसाहेब मारुती निकम (वडगाव गुप्ता, ता. नगर) सुजित नवनाथ पवार (खडांबे, ता. राहुरी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी चोरलेली बुलेट पोलिसांच्या स्वाधीन केली. 
 
निकम याच्याविरुद्ध नगरमध्येही मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आणखी काही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण सहा मोटारसायकली हस्तगत केल्या. सहायक निरीक्षक शिंदे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे, विजय भिंगारदिवे, गणेश धोत्रे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये बुलेट आहेत. ही गाडी आवडत असल्यामुळे चोरल्याचे निकमने पोलिसांना सांगितले. सध्या निकम पोलिस कोठडीत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...