आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Politics News In Marathi, Lok Sabha Election 2014,BSP, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: छाननीत नगरमधून एक, तर शिर्डीतून चार अर्ज अवैध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - उमेदवारी अर्ज छाननीत नगर लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पार्टीचे (बसपा) उमेदवार अनिल ओहोळ यांचा अर्ज बाद झाला. शिर्डी मतदार संघातून सहा अर्ज अवैध ठरवण्यात आले. शिर्डीतून योगेश घोलप यांचा शिवसेनेकडून भरलेला अर्ज अवैध, तर अपक्ष अर्ज वैध ठरवण्यात आला. दरम्यान, नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघात 17 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठीच्या लढतीचे अंतिम चित्र शनिवारी (29 मार्च) स्पष्ट होईल.


उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (26 मार्च) नगर लोकसभा मतदार संघातून 19 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदार संघातून 19 उमेदवारांनी 38 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. नगर लोकसभा मतदार संघातून राजीव राजळे (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप गांधी (भाजप) दीपाली सय्यद (आप), बी. जी. कोळसे (अपक्ष) या प्रमुख उमेदवारांसह इतर उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. बसपाचे उमेदवार अनिल ओहोळ यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. शिर्डी मतदार संघात 32 अर्ज वैध, तर चार अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यात योगेश बबन घोलप यांचा अपक्ष अर्ज वैध ठरवण्यात आला. शिवसेनेतर्फे त्यांनी भरलेला अर्ज अवैध ठरवण्यात आला. माधव त्रिभुवन (बसपा) यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरवण्यात आले. अशोक गायकवाड यांचा शिवसेनेचा अर्ज बाद ठरवण्यात आला. अपक्ष अर्ज ग्राह्य धरला आहे. विजय खाजेराव (समाजवादी पार्टी) यांचाही अर्ज अवैध ठरवण्यात आला.सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस), नितीन उदमले (आप) यांच्यासह इतर उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले.