आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar Politics News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi, Shirdi

नगर लोकसभा मतदारसंघामधून 8, तर शिर्डीतून 11 अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर लोकसभा मतदार संघातून 8 उमेदवारांनी 16 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर शिर्डी लोकसभा मतदार संघातून 11 उमेदवारांनी 17 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मंगळवारी नगर लोकसभा मतदार संघातून शिवेसना-भाजपचे उमेदवार दिलीप गांधी, अपक्ष म्हणून बी. जी. कोळसे व शिर्डी लोकसभा मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार नितीन उदमले या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारचा शेवटचा दिवस आहे.


मंगळवारपर्यंत नगर लोकसभा मतदारसंघातून 43 जणांनी 135 उमेदवारी अर्ज नेले आहेत. या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार राजळे यांनी यापूर्वीच आपला अर्ज दाखल केला होता, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 59 जणांनी अर्ज नेले आहेत. या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवार (19 मार्च) पासून उमेदवारी अर्ज दाखल व अर्जाची विक्री करण्यास सुरुवात झाली होती. नगर लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी 8 जणांनी, तर शिर्डीतून 6 उमेदवारांनी 9 अर्ज दाखल केले. शिर्डीत 11 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले आहेत.