आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिकेवर तीन दिवसांत हजारहून अधिक सह्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-पुणेरेल्वेसाठी कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी केलेल्या ऑनलाइन याचिकेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या याचिकेवर तीन दिवसांत एक हजारहून अधिक नागरिकांनी सह्या केल्या आहेत. साडेतीन हजारांहून लोकांनी ही याचिका वाचली आहे.

हा प्रतिसाद विक्रमी आहे. कारण या वेबसाईटवरील याचिकांना आठवडाभरात सुमारे शंभर सह्या होत असतात. मात्र, या याचिकेला दोन दिवसांत प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी सातशेहून अधिक लोकांनी या याचिकेवर सही केली. या याचिकेद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक, पुणे सोलापूर विभागांचे व्यवस्थापक यांच्याकडे या रेल्वेची मागणी करण्यात आली आहे. ही रेल्वे किती महत्त्वाची हे सह्यांद्वारे लोकांच्या प्रतिक्रियांद्वारे पटवून सांगण्यात येणार आहे.

नगर-पुणेदरम्यान थेट रेल्वेसेवेसाठी नुकतीच कृती समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा, उपाध्यक्ष अर्शद शेख, सचिव नितीन थोरात, सदस्य डॉ. संजय आसनानी, अशोक कानडे, एस. बी. रुणवाल, धनेश कोठारी, सय्यद साबिरअली, संजय सपकाळ, विपुल शहा, सुनील छाजेड, अजय दिघे, किरण भंडारी, जसमितसिंग वधवा, मिलिंद बेंडाळे, संतोष बडे आदी उपस्थित होते.

नगरहून पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाड्या सुरू व्हाव्यात, यासाठी ही समिती काम करत आहे. पहिला टप्पा म्हणून या समितीच्या सदस्यांनी खासदार गांधी यांना निवेदन दिले. त्यानंतर www.change.org या वेबसाईटवर ऑनलाइन याचिका रविवारी (२३ ऑक्टोबर) सायंकाळी दाखल करण्यात आली. त्यानंतर मंगळवारपर्यंत एक हजारहून अधिक लोकांनी तिच्यावर ऑनलाइन सह्या केल्या. याशिवाय या याचिकेबाबत आपले मतही अनेकांनी नोंदवले. त्यात नगरच्या प्रतिष्ठितांबरोबर सामान्यांचाही समावेश आहे.
जीवनातील बदलासाठीच...
या वेबसाईटवर मानवी जीवनाशी निगडित प्रश्नांवर याचिका दाखल केल्या जातात. या वेबसाईटवर आतापर्यंत १९६ देशांतील १९ हजार ६१९ याचिकांना यश प्राप्त झाले आहे. संबंधित वेबसाईट याचिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून ती माहिती संबंधित देशांतील सरकारी यंत्रणांकडे पाठवते.

वधवांच्या ट्विटलाही रेल्वेचा प्रतिसाद
कॉडलाइन नसल्याने दरवर्षी रेल्वेचे साडेतीन कोटींचे नुकसान होत असल्याचे ट्विट वधवा यांनी केले होते. त्यालाही रेल्वे मंत्रालयाने तत्काळ उत्तर देत संबंधित विभागांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा प्रश्नही आता वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात कृती समितीला यश आले आहे.
बातम्या आणखी आहेत...