आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट नगर-पुणे रेल्वेसाठी गडकरी यांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - औरंगाबाद-नगर-पुणे असा थेट रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी औरंगाबाद-नगर-पुणे कृती समितीचे नमिंत्रक नितीन थोरात यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. हे निवेदन रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याचे आश्वासन गडकरी यांनी दलि्याचे नितीन थोरात यांनी सांगितले.. या मार्गाला ‘दिव्‍य मराठी’ने सर्वात प्रथम वृत्तमालिकेद्वारे प्रकाशित केले.
गडकरी यांच्या नगर दौऱ्यादरम्यान थोरात यांनी हे निवेदन दिले. नगर-पुण्यादरम्यान दररोज एसटीच्या सुमारे आठशे बसेस धावतात. खासगी बसची संख्याही शंभराहून अधिक आहे. काही लोक आपल्या खासगी वाहनाने पुण्याला जातात. दररोज किमान दहा हजार प्रवासी नगर ते पुणे व तितकेच प्रवासी पुण्याहून नगरला येतात. पुण्याला शिक्षणासाठी राहणाऱ्या नगरच्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांहून दिला आहे. त्यामुळे रस्त्यावरून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.

औरंगाबाद-नगर-पुणे हा चौपदरी महामार्ग आहे. तो आताच कमी पडतो. अशावेळी या शहरांच्या दरम्यान थेट रेल्वेमार्गाची गरज आहे, असे थोरात यांनी गडकरी यांच्या नदिर्शनास आणले. ‘दिव्‍य मराठी’मध्ये प्रकाशित झालेल्या सर्व बातम्यांची कात्रणे त्यांनी निवेदनाला जोडली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशात शंभर ‘स्मार्ट शहरे’, तर पाचशे ‘दुय्यम स्मार्ट शहरे’ विकसित करण्याचे धोरण आहे. त्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग झाल्यास नगर स्मार्ट शहर म्हणून विकसित होऊ शकते. औरंगाबाद ते नगर व नगर ते पुणे हे अंतर अवघे दीड तासाचे होणार आहे. त्यामुळे नगरला राहून या दोन्ही शहरांत नोकरी करणे शक्य होईल, तसेच ही तनि्ही शहरे मिळून तिळी शहरे विकसित होतील, असे थोरात यांनी स्पष्ट केले. गडकरी यांनी हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.