आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेशनमध्ये होणार एस्केलेटरसह पूल, २४ तासांचे घड्याळ लावण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या रेल्वेस्टेशनवर एस्केलेटरसर (सरकते जिने) फूट ओव्हर ब्रिज (पादचाऱ्यांसाठी उड्डाण पूल), प्रवाशांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ‘आर ओ’ प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. पुढील तीन वर्षांत नगर स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी शुक्रवारी दिली.

या समितीची सोलापूर येथे बुधवारी बैठक झाली. त्यावेळी रेल्वेचे विभागीय रेल्वे अधिकारी अनिलकुमार दुबे यांनी विभागात नगरच्या रेल्वेस्टेशनवर होणाऱ्या सुविधांची माहिती सदस्यांना दिली. त्यात एस्केलेटरच्या उड्डाणुलाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सामान घेऊन जाताना प्रवाशांचे खूप हाल होतात. असा जिना झाल्यानंतर त्रास कमी होईल, तसेच लोकांचे धोकादायक पद्धतीने रेल्वेचे रूळ ओलांडण्याचे प्रकार बंद होतील. सोलापूर विभागात अशी सोय फक्त गुलबर्गा दौंड स्टेशनवरच आहे. त्यामुळे नगर स्टेशनचे रूप आधुनिक होणार आहे. या पुलासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

याशिवाय प्लॅटफॉर्म एक दोनवर पूर्ण लांबीची शेड तयार करण्यात येणार आहे. सध्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पूर्ण शेड नसल्याने उन्हाळा पावसाळ्यात प्रवाशांचे गाडी आल्यानंतर हाल होत आहेत. पूर्ण शेड झाल्यानंतर प्रवाशांची सोय होईल.

स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरचे मैदान दोन भागांत विभागले गेले आहे. त्यातही प्रतीक्षालय तिकीट खिडकी असलेल्या कार्यालयासमोरचे मैदान खड्ड्यात आहे. तेथे टांगा रिक्षा स्टँड आहे, पण तेथे भरदिवसा पत्त्यांचा जुगार चालतो. आता दोन्ही मैदाने एका पातळीत आणण्यात येणार असल्याची माहिती वधवा यांनी दिली. पार्सल डेपोचे सामान प्लॅटफॉर्मपर्यंत येत होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आता ते येणार नाही, असे त्यांनी सांगितले. सध्या स्टेशनमध्ये जाण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. सुरक्षेच्या कारणासाठी एकच प्रवेशद्वार करण्याची मागणी वधवा यांनी केली आहे.

तिकीट निरीक्षकांचा सन्मान
नगरचेतिकीट परीक्षक संजय झा श्रीरामपूरचे तिकीट परीक्षक आर. पी. सिंग यांनी उत्कृष्ट काम करून रेल्वेला जास्तीत महसूल मिळवून दिल्याबद्दल या बैठकीत विभागीय रेल्वे अधिकारी दुबे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. विभागातील अशा सहा जणांचा सन्मान करण्यात आला.

- शिर्डी-मुंबई पॅसेंजरची शिर्डीतून निघण्याची वेळ पाच वाजता करावी. अनेक प्रवासी संघटनांनी अशी मागणी केली आहे. पूर्वी ती वेळ पावणेपाच होती. सध्या ती चार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- स्टेशनवर २४ तासांचे घड्याळ लावावे. अनेकदा रात्री १२ नंतरच्या वेळांच्या गाड्यांसाठी प्रवासी दुपारी येतात. त्यामुळे गाडी चुकते.
-शिर्डी फास्ट पॅसेंजरला वाढीव डबे जोडावेत.
-शहरात प्रवासी (यात्री) सुविधा केंद्र सुरू करावे. त्यामुळे आरक्षण विनाआरक्षणाचे तिकीट नगरमध्ये मिळणे शक्य होईल. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर जाण्याची गरज राहणार नाही.

खाद्यविक्रेत्यांवर होणार कारवाई
सोलापूरविभागात रेल्वे गाडी स्टेशनवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे दुबे यांनी बैठकीत जाहीर केल्याचे वधवा यांनी सांगितले. या खाद्यपदार्थांमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने नुकतेच प्रकाशित केले होते. त्याची गंभीर दखल या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती वधवा यांनी दिली.

आता लढा हवा दुहेरीकरणासाठी
सध्यामनमाडते दौंड दरम्यान दुहेरी रेल्वेमार्ग अत्यावश्यक आहे. त्यासाठी नगरचे राजकीय नेतृत्व नागरिकांनी लढा उभारण्याची गरज आहे. तसे झाल्यास नगर जिल्ह्याच्या विकासास ते पोषक ठरणार आहे.'' हरजितसिंग वधवा, सदस्य,विभागीय रेल्वे सल्लागार समिती
श्रीरामपूरचे तिकीट परीक्षक आर. पी. सिंग यांनी उत्कृष्ट काम करून रेल्वेला जास्तीत महसूल मिळवून दिल्याबद्दल बैठकीत विभागीय रेल्वे अधिकारी दुबे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र रोख रकमेचे बक्षीस दऊन सन्मान करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...