आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत खड्डे बुजवा; अन्यथा अधिकाऱ्यांना लावणार भीक मागायला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातीलसर्वच रस्त्यांची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नगरकरांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासन मात्र खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली दरवाजा परिसरात बुधवारी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

येत्या तीन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्यास अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातून उचलून आणून रस्त्यावर भीक मागायला लावण्याचा इशारा बनसोडे यांनी दिला. ऐन नवरात्रोत्सवात नागरिकांना खड्ड्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवात काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले, परंतु हे खड्डे पावसामुळे पुन्हा उघडे पडले अाहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल्लीग दरवाजा परिसरात भीक मागो अांदोलन करण्यात आले. नागरिकांनीदेखील या आंदोलनाचे स्वागत करत खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला भीक दिली. केंद्र, राज्यात महापालिकेत सत्ता असूनही निधी नसल्याच्या थापा पदाधिकारी मारत आहेत. मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढण्यासाठी मात्र यांच्याकडे निधी आहे. तापी संस्थेला alt147अमृत'चे काम देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मोठी 'डिल' केली, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. भीक मागून जमा झालेली रक्कम आयुक्तांना देण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले नाही, तर अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातून उचलून आणू. या अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभे करून त्यांना भीक मागायला लावू, असा इशारा बनसोडे यांनी दिला. यावेळी नीलेश बांगरे, अंकुश मोहिते, अजिंक्य बोरकर, साधना बोरुडे, प्रवीण घावरी, अजिंक्य भिंगारदिवे, वैभव ढाकणे, बाबा खान, समीर बागवान, मतीन ठाकरे, सिध्दार्थ आढाव, अमोल खाडे, रंजना उकिर्डे, राहुल आल्हाट, प्रतीक औचारे, समीर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...