आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या सिद्धांतचा विम्बल्डनमध्ये डंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या सिद्धांत बांठिया या १४ वर्षांखालील अग्रमानांकित राष्ट्रीय टेनिसपटूने विम्बल्डन येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याच्या या कामगिरीने नगरच्या क्रीडा क्षेत्राला नवे चैतन्य मिळाले आहे.
येथील एमआयडीसीतील जय इंडस्ट्रिजचे संचालक जगदीश बांठिया यांचा सिद्घांत हा मुलगा आहे. तो सध्या पुण्याच्या बिशप स्कूलमध्ये इयत्ता नववीत शकित आहे. टेनिस बॉल स्पर्धेची पंढरी समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन येथील ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारतातील खेळाडूंना यावर्षी पहिल्यांदाच संधी मिळाली. या संधीचे सोने करत सिद्धांतने राष्ट्रीय अग्रमानांकन सार्थ ठरवत विजेतेपदावर नाव कोरले. लंडनमधील ऑल इंग्लंड क्लबच्या ग्रास कोर्टवर खेळण्याचे लहानपणापासून जोपासलेले स्वप्न पूर्ण करताना त्याने अंतिम सामन्यात अडीच तासांत विजय मिळवला. मिडसेक्सचा अग्रमानांकित मॅक्सिम ट्रेनिखनि याच्याविरुद्ध विजेतेपदासाठी सिद्धांतची लढत झाली.
या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सिद्धांतचे कुटुंबीयही लंडनला गेले होते. सिद्धांत विजेतेपदासह मायदेशी परत निघाला असून सुरुवातीला पुण्यात व नंतर तो नगरला येणार आहे. पुण्याच्या डेक्कन जिमखाना क्लबवर आंतरराष्ट्रीय प्रशकि्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो.
फोटो - विम्बल्डन येथे पटकावलेल्या मानाच्या चषकासह नगर येथील राष्ट्रीय टेनिसपटू सिद्धांत बांठिया.