आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयोन्मुख गायकांची येत्या शनिवारी मैफल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - येथील सरगमप्रेमी मित्रमंडळाने येत्या शनिवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात ‘नवे सूर - नवे रंग’ ही युवा गायकांची मैफल आयोजित केली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांची असून तेच या मैफलीचे निवेदक आहेत, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष मोरेश्वर कुलकर्णी यांनी रविवारी दिली.

या मैफलीत पंडित जसराज यांचे शिष्य योगेश हंसवाडकर (मुंबई), पंडित विजय कोपरकर यांचे शिष्य मंदार गाडगीळ (पुणे) व डॉ. सुलभा पिशवीकर यांच्या शिष्या डॉ. भाग्यर्शी मुळे (कोल्हापूर) हे उदयोन्मुख गायक शास्त्रीय व सुगम संगीत सादर करतील. योगेश हंसवाडकर व मंदार गाडगीळ यांच्या मैफली सध्या महाराष्ट्रात गाजत आहेत. डॉ. भाग्यर्शी यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर, र्शीधर फडके, अरुण दाते, यशवंत देव अशा नामवंत कलाकारांसमवेत गायन केले आहे. ‘नादवेद’ या कार्यक्रमांतून त्यांची ओळख नगरकरांना नुकतीच झाली आहे.

मंदार गाडगीळ हे कॉम्प्युटर इंजिनिअर असून आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. हंसवाडकर हे मेवाती घराण्यातील गायक असून आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट आहेत. शास्त्रीय गायन हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय आहे. कुंदगोळ येथील सवाई गंधर्व महोत्सवातील त्यांची मैफल विशेष गाजली.

डॉ. भाग्यर्शी यांनी पुणे, मुंबई, सातारा, सांगली, बेळगाव अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत. अनेक संगीतसभा त्यांनी गाजवल्या आहेत. ‘सुगम संगीतातील सुधीर फडके यांचे योगदान’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आहे. अनुराधा पौडवाल यांच्यासमवेत त्यांनी दोन मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे. ‘राऊ’ या मालिकेत त्यांनी अभिनयही केला आहे. या कलावंतांना भरत कामत (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी) व माउली टाकळकर (टाळ) साथसंगत करतील. सोलापूर यांच्या निवेदनामुळे मैफल अधिक रंगते. या कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सरगम’चे कार्याध्यक्ष धनेश बोगावत यांनी केले. ‘संगीत सौभद्र’ हे नाटक व रशीद खाँसाहेब यांचे गायन हे ‘सरगम’चे पुढील कार्यक्रम असतील, असे त्यांनी सांगितले.