आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: मराठीच्या वाचनात नगरचे विद्यार्थी राज्यात दहाव्या स्थानावर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर जिल्हा परिषद शाळांतील सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी वाचनात राज्यात दहाव्या स्थानावर अाहेत. भागाकर करण्यात नगरचे विद्यार्थी राज्यात अकराव्या क्रमांकावर आहेत. राज्यात सातारा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी वाचनात ८१ टक्के, तर नगरचे विद्यार्थी ७१.१ टक्के आहेत. भागाकार करण्यात सातारा ४०.४ टक्के नगरचे ३३.५ टक्के विद्यार्थी आहेत. ही माहिती शिक्षण विभागाने केलेल्या राज्यातील सध्याची शैक्षणिक स्थिती या अहवालात देण्यात आली. 


शिक्षण विभागाने राज्यातील सध्याची शैक्षणिक स्थिती या तयार केलेल्या अहवालानुसार राज्यात जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवी या वर्गांतील मराठी या विषयात वाचन करणारे ७१ टक्के विद्यार्थी असून, राज्याच्या तुलनेत नगरची स्थिती चांगली आहे. नगर जिल्ह्यातील सहावी ते आठवी या वर्गांतील मराठी या विषयात वाचन करणारे विद्यार्थी ७८.१ टक्के आहेत. सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील ८१.६ टक्के विद्यार्थी आहेत. सहावी ते आठवी या वर्गातील गणित या विषयात भागाकार करण्यात राज्याच्या तुलनेत सातारा जिल्हा अव्वल असून, ४०.४ टक्के विद्यार्थी भागाकार करतात. 


साताऱ्यानंतर नगर जिल्ह्यात ३३.५ टक्के विद्यार्थी भागाकार करू शकतात. सातारा, नगरच्या तुलनेत राज्यातील स्थिती निराशाजनक असून, राज्यात केवळ २९.७ टक्केच विद्यार्थी भागाकार करू शकतात. नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तिसरी ते चौथी या वर्गात मराठी या विषयांत मूलभूत क्षमता प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या ८३.६ टक्के असून, राज्याची ७२.५ टक्के आहे, तर सर्वाधिक सातारा जिल्ह्याची ९२.५ टक्के आहे. जिल्ह्यातील या वर्गातील १६ टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता अप्राप्त आहे. तिसरी ते चौथी या वर्गात मराठी या विषयात वाचनात नगर जिल्ह्याचा आठवा क्रमांक आहे, तर वजाबाकीत सातवा क्रमांक आहे. गणित या विषयातील वजाबाकी करण्यात नगरचे ५०.९ टक्के विद्यार्थी आहेत. राज्याची टक्केवारी नगरच्या तुलनेत कमी असून, राज्याची टक्केवारी ३९.१ टक्के, तर सातारा जिल्ह्याची टक्केवारी सर्वाधिक ६४.२ टक्के आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला सुधारणा करण्यास मोठा वाव आहे, असे जाणकार सांगतात. 


विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवू 
जिल्हापरिषद शाळांमध्ये शिक्षणाची चांगली स्थिती आहे. वाचनात नगरचे नाव राज्यात दहाव्या क्रमांकावर आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी पुढाकार घेत आहेत. विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढावी, यासाठी शिक्षण समितीकडून आणखी चांगले निर्णय घेतले जातील. 
- राजश्री घुले, उपाध्यक्ष, तथा सभापती, शिक्षण समिती. जिल्हा परिषद. 

बातम्या आणखी आहेत...