आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर तालुका सहकारी कारखाना विक्रीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर तालुका सहकारी साखर कारखाना 75 कोटींच्या थकीत कर्जबाकीमुळे राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढला आहे. या निर्णयामुळे ज्या सभासदांनी कारखान्याचे समभाग (शेअर्स) घेतले, त्यांची किंमत शून्य होणार आहे. परिणामी 17 हजार 642 सभासदांना तब्बल 5 कोटींचा फटका बसणार आहे.

नगर तालुका सहकारी साखर कारखाना 2002 मध्ये सुरू झाला. त्यापूर्वी 1 वर्ष भागभांडवल गोळा करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार दादा पाटील शेळके गावोगावी फिरले. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी समभाग विकत घ्यावेत, यासाठी त्यांनी लोकांना विनंती केली. समभागाची किंमत प्रत्येकी दोन हजार ठेवण्यात आली होती. समभाग विकत घेण्यासाठी गावोगावच्या सेवा सोसायट्यांकडून कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी समभाग विकत घेतले. अनेक तालुक्यांनी सेवा सोसायट्यांकडून कर्जाऊ समभाग विकत घेतले. 4 वर्षांपूर्वी समभागांची किंमत 1 हजारांनी वाढवण्यात आली. ही रक्कमसुद्धा सभासदांकडून वसूल करण्यात आली. 17 हजार 642 - अ वर्ग, 229 ब वर्ग सभासदांचे तब्बल 4 कोटी 94 लाख कारखान्याकडे जमा आहेत. सभासदांना समभागाचा लाभ तर झाला नाहीच, पण सोसायट्यांकडून कर्जाऊ घेतलेल्या रकमेचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला.

सभासदांचे पैसे द्या
शेतकर्‍यांनी सेवा सोसायट्यांकडून कर्ज घेऊन शेअर्स विकत घेतले. सेवा सोसायट्यांनी त्यांच्या कर्जाची वसुली शेतकर्‍यांकडून केली. राज्य सहकारी बँकही आता त्यांच्या कर्जाची वसुली कारखाना विकून करून घेत आहे, पण शेतकर्‍यांचे जे 5 कोटी कारखान्याकडे समभागापोटी जमा आहेत त्यांचे काय? ते शेतकर्‍यांना व्याजासह मिळायला हवेत.’’ गोवर्धन रोकडे, सभासद.