आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagar Teacher Bank Meet First Time Over By Come Manner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर शिक्षक बँकेची सभा प्रथमच शांततेत पार पडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ, आरोप-प्रत्यारोप, झोंबाझोंबी होण्याची परंपरा आहे. रविवारी ही परंपरा खंडित होऊन प्रथमच सभा शांततेत झाली. विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकल्याने अडचणीचे प्रश्न कोणीही विचारले नाहीत. त्यामुळे ही सभा एकतर्फी झाली.

शिक्षक बँकेची सभा यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात बँकेचे अध्यक्ष चांगदेव ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष नारायण राऊत, संचालक गोकुळ कळमकर, गहिनीनाथ शिरसाठ, नवनाथ तोडमल, प्रतिभा साठे, सतोष दळे, मुख्य कार्यकारी अधिकारी केशव ढाकणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षक बँकेची सभा म्हटले की, गोंधळ आणि वादंग असे समीकरण तयार झाले होते. सभेत विरोधकांकडून सत्ताधार्‍यांना कात्रीत धरले जाते. सत्ताधारी सभासदांचे हित पाहून निर्णय घेतल्याचे सांगत्े2ात, तर हे निर्णय सभासदांच्या हिताचे नाहीत हे विरोधक त्यांच्या पद्धतीने पटवून देतात. सर्व मंडळांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात.

बँकेची सभासदसंख्या साडेदहा हजार असूनही सभागृहात अवघे पाचशे ते सहाशे सभासद उपस्थित होते. विरोधी मंडळांनी बहिष्कार घातल्याने सभेत अडचणीचे प्रश्न कोणीही विचारले नाहीत. त्यामुळे बँकेच्या अलीकडच्या इतिहासात प्रथमच ही सभा शांततेत झाली. विषयपत्रिकेवरील 11 विषय वाचण्यापूर्वीच मंजुरीचे फलक दाखवण्यात आले. नफावाटणीस मान्यता, 2013-2014 चे अंदाजपत्रक, सभासदांच्या प्रशिक्षणासाठी योजनेची नोंद यासह सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. कर्जवाटप बंद करण्याची वेळ आली असताना कर्जवाटप बंद न करता कमी केले. बँकेने 72 कोटी 33 लाखांच्या ठेवी वाढवल्या असून भागभांडवल 21 कोटी 40 लाखांपर्यंत वाढवले आहे, असे ढेपले यांनी सांगितले. सभा एक ते दीड तासात शांततेत पार पडली.


सभागृहाला छावणीचे स्वरुप
शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेला होणारा गोंधळ लक्षात घेऊन कोतवालीचे उपनिरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेत गोंधळ घालणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेण्याची पूर्वतयारी म्हणून एक पोलिस व्हॅनही सभागृहाबाहेर उभी होती. त्यामुळे सहकार सभागृहाला छावणीचे स्वरूप आले होते. विरोधी सभासद निषेधाचे फलक घेऊन आत जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावरून किरकोळ वादावादीही झाली.


सापांची पिलावळ
स्वाभिमानी ऐक्य, इब्टा व गुरुकुल मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी सभेवर बहिष्कार घातला. सभा सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी बाहेर निदर्शने व घोषणाबाजी केली. ‘डोम्या नाग व वीस सापांची पिलावळ पितेय शिक्षक बँकेचे दूध’ असा फलक दाखवून विरोधकांनी बँकेच्या कारभाराचा निषेध केला.


कर्जमर्यादेत वाढ
प्राथमिक शिक्षक बँकेची पूर्वीची कर्जमर्यादा 3 लाख 55 हजार होती. सभासदांच्या आग्रहामुळे या र्मयादेत 1 लाखाची वाढ करण्यात आली. असाध्य आजारांसाठीची मदत 10 हजारांवरून 25 हजारांपर्यंत वाढवण्यात आली. सभासदांचा अपघाती विमा 100 रुपये वार्षिक हप्त्यावर उतरवण्याचेही या सभेत ठरले.