आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टेक्नो फन - 2014’ मध्ये 328 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात नुकताच ‘टेक्नो फन 2014’ हा ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांतील 328 विद्यार्थी यात सहभागी झाले.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त अँड. वसंतराव कापरे यांच्या हस्ते झाले. नवी क्षितिजे काबिज करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य बी. डी. बोर्डे, प्रा. ए. बी. दळवी, प्रा. जे. एस. गिते, प्रा. आर. टी. लवांडे, प्रा. शिरसाठ यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले वृद्ध पेशंटची देखभाल करणारे इलेक्ट्रॉनिक्स यंत्र, सीमकार्डवर चालणारे इलेक्ट्रिक मीटर, शेतीतील मातीचे बाष्प, पाणी कंट्रोल करणारे ऑटोमॅटिक यंत्र, थ्री इन वन एअर कूलर, वॉटर हिटर व फ्रीज आकर्षण ठरले.

बाल कामगार समस्या, मोबाइलचे दुष्परिणाम, ग्लोबल वार्मिंग, वीजनिर्मितीचे नैसर्गिक स्त्रोत हे प्रोजेक्ट यावेळी सादर केले गेले. सिव्हिल विभागात मुलांच्या प्रतिकृतीची स्पर्धा रंगली होती. टाकाऊ वस्तू, पुठ्ठे, काड्या, सायकलचे निकामी स्पोक, तसेच आईस्क्रिमच्या काड्यापासून तयार केलेल्या ब्रिजच्या आकर्षक व टिकाऊ प्रतिकृती लक्ष वेधून घेत होत्या. संगणकावर घर डिझाईन तयार करण्याच्या स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी भाग घेतला.