आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा पारा 41 अंशानी वाढला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहराच्या तापमानात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिला आठवड्यातच शहराचा पारा 41 अंशावर पोहोचला आहे. शनिवारी (13 एप्रिल) रोजी शहराचे तापमान 41.4 अंश सेल्सिअस होते. कडाक्याचे ऊन व उकाड्यामुळे नगरकर हैराण झालेले आहेत. दरम्यान, उन्हाचा कडाका वाढल्यामुळे बाजारपेठेतही दुपारी शुकशुकाट होता.

मागील सहा दिवसांपासून शहराचा पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उन्हाचा जनजीवनावरही विपरीत परिणाम झाला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर उन्हामुळे तुरळक वाहने दिसत होती. सराफ बाजार, कापड बाजार, मेन रोड, दिल्लीगेट, चौपाटी कारंजा या भागात दुपारी शुकशुकाट होता. तुरळक ठिकाणी गर्दी दिसत होती. उन्हामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालही दुपारी काम न करता विर्शांती घेताना दिसत आहेत. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक सावलीच्या ठिकाणी थांबताना दिसत आहे.

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे नागरिक शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी करताना दिसत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक पांढरे रूमाल, गॉगल्स व टोप्यांचा वापर करताना दिसत आहेत.
तारीख पारा तारीख पारा

4 38.4 5 37.5

6 39.3 7 40.01

8 39.6 9 40.30

10 41.0 11 39.8

12 39.3 13 41.4