आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरारी झालेल्या कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या व पॅरोलवर कारागृहाबाहेर येऊन फरारी झालेल्या तीन कैद्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून संबंधित पोलिस ठाण्यांच्या ताब्यात दिले. या पोलिस ठाण्यांमार्फत या कैद्यांची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली.

खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी बाबासाहेब ऊर्फ लिंबाजी सूर्यभान वारूळे (वारुळवाडी, ता. नगर) पॅरोलच्या रजेवर बाहेर आल्यानंतर पुन्हा कारागृहाकडे फिरकलाच नाही. मागील नऊ वर्षांपासून तो फरारी होता. एलसीबीच्या पथकाने 26 जानेवारीला त्याला अटक करून भिंगार कँप पोलिसांच्या ताब्यात दिले. कँप पोलिसांनी त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली.

खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी भास्कर जनार्दन साळुंके (वाकडी, ता. नेवासे) पॅरोलवर बाहेर आल्यानंतर गेल्या 7 महिन्यांपासून फरारी होता. एलसीबीच्या पथकाने त्याला अटक करून नेवासे पोलिसांच्या स्वाधीन केले. नेवासे पोलिसांनी त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली.

नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी राजेंद्र शांतीलाल नहार (घोडेगाव, ता. नेवासे) गेल्या चार वर्षांपासून फरारी होता. त्याला शहरातील कोठी परिसरात छापा टाकून अटक करण्यात करून नेवासे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.