आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नलसाठी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करणार : डॉ. संजीवकुमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नागापूर एमआयडीसीतील सनफार्मा चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या चौकात सिग्नल बसवण्याबाबत पोलिस अधीक्षक रावासाहेब शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चा करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्योगमित्र बैठकीत ते बोलत होते. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, मराठा चेंबर्स ऑफ कॉर्मसचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, उद्योजक हरजितसिंग वधवा, अजित घैसास, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आर. बी. गांगुर्डे, बाबासाहेब काळे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत भूसंपादन, अग्निशामक कार्यालय, एमआयडीसीतील रस्ते, पाणी पुरवठा याबाबत चर्चा झाली. उद्योजकांनी प्राप्तीकर विभाग व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय औरंगाबादऐवजी पुण्याला हवे, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचा प्रस्ताव उद्योजकांनी सादर करण्यास सांगितले. एका कंपनीचे दूषित पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी या कंपनीच्या चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिले. एमआयडीसीला रविवारी सुटी जाहीर करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी महावितरणचे अधिकारी प्रभाकर हजारे यांच्याशी संपर्क साधला असता हजारे यांनी एमआयडीसीला 24 तास वीज देण्यात येत आहे. त्यामुळे रविवारच्या सुटीबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवरच घ्यावा, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.