आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नगर अर्बन’च्या चौकशीचे आदेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सन 2010-11 या आर्थिक वर्षात नगर अर्बन बँकेच्या लेखापरीक्षण अहवालात आढळून आलेल्या गंभीर मुद्यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 88 अन्वये चौकशी करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक दिनेश ओहोळकर यांनी दिले आहेत. चौकशीसाठी लेखापरीक्षक राम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे लेखापरीक्षण कावडिया, पारख अ‍ॅण्ड असोसिएट्स (जळगाव) या संस्थेकडून करण्यात आले होते. काही गंभीर बाबी, तसेच संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळल्यामुळे या अहवालाची सहकार खात्यामार्फत पडताळणी करण्यात आली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 88 अन्वये चौकशीचे, तसेच जबाबदारी निश्चितीचे आदेश अपर निबंधकांनी 9 जानेवारीला दिले.बँकेने जालना येथे वितरित केलेले 14 कोटींचे कर्ज, संस्थेची सभासद यादी अद्ययावत करण्याच्या कामाचा व्यवहार, तसेच इतर संशयास्पद बाबींची चौकशी होणार आहे. सहकार कायद्याच्या कलम 88 अन्वये नगर अर्बन बँकेची यापूर्वीही एकदा चौकशी झाली आहे. दोषी आढळलेल्या संचालक व अधिका-यांवर 3 कोटी 88 लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.