आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर अर्बन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची अखेरची सर्वसाधारण सभा 21ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सत्ताधारी व विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या नगर अर्बन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची शेवटची सर्वसाधारण सभा 21 ऑगस्टला होत आहे. या सभेत मतदानासाठीचा अधिकार व मल्टिस्टेटचा दर्जा या प्रमुख मुद्दय़ांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

बँकेला 4 एप्रिल 2013 रोजी केंद्रीय निबंधकांकडून मल्टिस्टेटचा दर्जा मिळाला. त्यानंतर सत्ताधारी व विरोधक संचालकांमधील आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. हा दर्जा मिळवण्यासाठी अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी बनावट ठराव व कागदपत्रांचा वापर केल्याच्या तक्रारी केंद्रीय निबंधकांकडे करण्यात आल्या. त्यानुसार चौकशी सुरू झाली. त्यातच एक हजारांचा शेअर घेणार्‍या सभासदांचाच मतदानाचा अधिकार अबाधित राहणार असल्याचे सांगण्यात आले. मल्टिस्टेट दर्जा व मतदानाचा अधिकार या मुद्दय़ावर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अँड. अशोक कोठारी यांनी ही याचिका दाखल केली. विद्यमान संचालक मंडळाची मुदत 22 ऑगस्टला संपणार आहे. सहकार कायद्यानुसार 30 सप्टेंबरपूर्वी सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. या संचालक मंडळाला अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही. मुदत संपल्यानंतर होणारी सभा बेकायदेशीर ठरली असती. सभेचे विषय ठरवण्यासाठी 3 ऑगस्टला संचालक मंडळाची बैठक होणार आहे. सध्या संचालक मंडळात सत्ताधार्‍यांपेक्षा विरोधकांची संख्या अधिक आहे.

सत्ताधार्‍यांचा खोटेपणा उघड
ऑगस्ट 2011 च्या सभेत कांबळे यांनी ठराव मांडला नव्हता, तर केवळ भावना व्यक्त केल्या होत्या. मल्टिस्टेट हा आयत्या वेळेचा विषय होऊ शकत नाही. विषयपत्रिकेत हा विषय नव्हता. पंधरा दिवस अगोदर सभासदांना कल्पना दिलेली नव्हती. कांबळे यांनी व्यक्त केलेल्या भावनेच्या मागे दडून दिलीप गांधी यांनी मल्टिस्टेटचा डाव साधला. मतदानाच्या अधिकाराबाबत कांबळे यांनी दिलेली कबुली व त्यासाठी सर्वसाधारण सभेच्या केलेल्या मागणीवरून गांधी यांचा खोटारडेपणा उघड होतो.’’ राजेंद्र गांधी, संचालक, नगर अर्बन बँक.