आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टॉकबिज’च्या रूपाने व्हॉटस् अॅपला पर्याय, बिबवेवाडी येथील तरुणाची मोबाइल तंत्रज्ञानात गरुडझेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओतूर - शेतकरी असो वा बिझनेसमन, स्मार्ट फोन हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक बनला आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी येथील पंकज साळुंखे या तरुणाने ‘टॉकबिज’ नावाचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ॲप विकसित करून स्वदेशीच्या नाऱ्याला हातभार लावला आहे. 
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत असतात. अनेकजण आपले आर्थिक व्यवहारही मोबाइलद्वारे करतात. ज्या ॲप्सद्वारे सध्या प्रत्येकजण एकमेकांशी संपर्क साधतो, ते सर्व परदेशी बनावटीचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिल्यानंतर पंकज साळुंखे यांना प्रेरणा मिळाली आणि स्वदेशी ॲप तयार करण्याची त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली. 
 
संगणकतज्ज्ञ असलेल्या पंकज यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ‘टॉकबिज’ नावाचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ॲप तयार केले. परदेशी बनावटीच्या व्हॉटस् अॅपला स्वदेशी बनावटीच्या ‘टॉकबिज’च्या रूपाने पंकज यांनी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. केवळ महिनाभरात ५० हजारांवर भारतीयांनी हे ॲप डाऊनलोड केले. 

याबाबत साळुंखे म्हणाले, टॉकबिज ॲपमध्ये फेसबुकसह इतरही अनेक ॲप एकत्रित उपलब्ध होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशातील अनेक बेरोजगारांना ‘टॉकबिज’ ॲप रोजगाराची संधी निर्माण करून देणार आहे. त्यामुळे अल्पावधीतच ‘टॉकबिज’ला उदंड प्रतिसाद मिळत असून आहे. लवकरच या अॅपमध्ये आणखी सुधारणा करून त्याचा वापर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा करता येईल, या दृष्टीने पंकज यांचे प्रयत्न सुरू आहेत. 
 
टॉकबिजॲपची वैशिष्ट्ये  
- ‘टॉकबिज’वरबेरोजगारांसाठी अनेक संधी उपलब्ध. रोजगाराला मिळेल चालना. 
- आलेला वर्ड मेसेज तुम्ही ऐकू शकता. आलेल्या मेसेजखालील बटनाला टच केल्यानंतर वर्ड टू व्हॉईसद्वारे मेसेज ऐकू येतो. 
- मेसेज शेड्यूल करता येतात. मित्राला किंवा नातलगांना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता शुभेच्छा देणारा मेसेज टाईम शेड्युल करा. तुमचा मेसेज बरोबर १२ वाजता पोहोचेल. 
- ‘टॉकबिज’वर डीपी ठेवण्यासाठी मल्टिपल सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे एकाच वेळी अनेक डीपी ठेवता येतात. 
- फेसबुकवर ज्याप्रमाणे तुम्ही पोस्ट टाकता, तशी पोस्ट ‘टॉकबिज’वरूनही टाकता येते. 
- फेसबुकप्रमाणेच स्टेटस् आणि प्रोफाइलसुद्धा टाकता येते. आणखी काही वैशिष्ट्येही या अॅपमध्ये आहेत. 
बातम्या आणखी आहेत...