आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nagar Z P Shaleya Poshan Aahar Worker Payment Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर वाचला अडचणींचा पाढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वाढत्या महागाईमुळे मानधनाचे हजार रुपये पुरत नाही. शिवाय बँकखात्यात ते जमा होण्यासाठी सहा महिन्यांपर्यंत वाट पहावी लागते, अशा व्यथा शालेय पोषण आहाराच्या मदतनिसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्यासमोर गुरुवारी मांडल्या.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन लंघे यांच्या हस्ते झाले. उपाध्यक्ष मोनिका राजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, सदस्य प्रतिभा पाचपुते, गंगाराम रोहोकले, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, लेखाधिकारी दीपक काटे आदी यावेळी उपस्थित होते.

लंघे यांनी मदतनीसांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थित महिलांनी यावेळी अडचणींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. कर्जत येथील मंगल सोनमाळे म्हणाल्या, तुटपुंजे हजार रुपयांचे मानधन, ते देखील वेळेवर मिळत नाही. शासनाने आतातरी आमचा विचार करावा. यावर लंघे म्हणाले, वेळेवर मानधन देण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील. अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही तर आमच्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल. मानधन संबंधित मदतनिसाच्या खात्यात वेळेवर जमा व्हायला हवे. त्यात दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई केली जाईल. शालेय पोषण आहार ही राज्याची योजना असल्याने तुमच्या भावना आम्ही शासन दरबारी मांडू, असे आश्वासन लंघे यांनी दिले.

उपाध्यक्ष राजळे म्हणाल्या, मानधन वाढीबाबत शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील.