आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन भरतीत कंत्राटी कामगारांना प्राधान्य, सीईओ रूबल अग्रवाल यांचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नवीन भरती करताना कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रुबल अग्रवाल यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाला दिले, अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धी सचिव नरेंद्र दाभाडे यांनी दिली.
संघटनेच्या शिष्टमंडळाने कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अग्रवाल यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले, र्शावण आल्हाट, संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुणवंत खुरंगळे, कार्याध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे आदी उपस्थित होते. थांबवलेल्या वार्षिक वेतनवाढी, 100 बिंदू नामावलीप्रमाणे पदोन्नती मिळावी, रिक्त पदे भरणे, जातीचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍यांवर गुन्हे दाखल करणे, वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना शैक्षणिक अर्हतेप्रमाणे पदोन्नती द्यावी आदी मागण्या या शिष्टमंडळाने मांडल्या.
अग्रवाल यांनी मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेत नवीन भरती करताना कंत्राटी कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात विभागप्रमुखांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अग्रवाल यांनी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांची दखल घेतल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले.