आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांनी घेतली हुंडाविरोधी शपथ; मान्यवरांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अोम गार्डन येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत उपस्थितांनी हुंडाविरोधी शपथ घेतली. - Divya Marathi
अोम गार्डन येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत उपस्थितांनी हुंडाविरोधी शपथ घेतली.
नगर- हुंडाबंदीही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुलीचे लग्न होणे, हुंड्यासाठी पैसे नसणे अशा गोष्टींची समाजाला जाणीव व्हावी, या प्रश्नाचे गांभीर्य समजावे, यासाठी ओम मातोश्री पेट्रोलपंपाचे संचालक बाळासाहेब पवार यांनी पुढाकार घेतला आहे. 
 
शीतल वायक हिने हुंड्यामुळॆ केलेल्या आत्महत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओम गार्डन येथे महाराष्ट्र दिनी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्व समाजांतील व्यक्तींनी एकत्र येत हुंडाविरोधी शपथ घेतली. लग्नात मागितला जाणारा हुंडा हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रथेला विरोध करण्यासाठी समाजातील सुसंस्कृत सुशिक्षितांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत बाळासाहेब पवार यांनी यावेळी व्यक्त केले. 
 
या बैठकीसाठी आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, अॅड. शिवाजी कराळे, संजय कळमकर, नगरसेवक बाळासाहेब पवार, अड. नलिनी गायकवाड, प्रा. अनिता भद्रे, सुनीता बागडे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी महापौर शीला शिंदे, रावसाहेब कांबळे, छाया बंडगर, माया जगताप, जंगम आदी मान्यवर सर्व समाजांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

 
बातम्या आणखी आहेत...