आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय साठमारीत नगरकर वाऱ्यावर !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेचा कारभार सध्या सत्ता अर्थकारणात अडकला आहे. त्यात सर्वसामान्य नगरकर भरडले जात आहेत. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच नगरसेवक सहलीवर गेले आहेत. परिणामी मनपाची नागरी सेवा कोलमडली आहे. नागरिक संताप व्यक्त करत आहेत. महापौरपदासाठी सुरू असलेल्या घोडेबाजारात अनेक नगरसेवक लखपती होतील, परंतु नागरी सुविधांचे काय, असा सवाल जागरूक नगरकर उपस्थित करत आहेत.
अामदार संग्राम जगताप यांनी आठ दिवसांपूर्वी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी आठ दिवस अगोदरच रिक्त होणाऱ्या महापौरपदाच्या खुर्चीकडे अनेकजण डोळे लावून बसले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत एकही नगरसेवक आपल्या प्रभागात फिरकला नाही. उलट, सहलीवर जाऊन नागरिकांच्या दु:खावर (समस्यांवर) मीठ चोळण्याचा प्रयत्न हे नगरसेवक करत आहेत.
लोकप्रतिनिधीच पसार झाल्याने प्रशासनही सुस्त झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सावेडी उपनगरातील विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना एेन उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. केडगाव उपनगरात, तर सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे.
पावसाळा तोंडावर असताना नालेसफाई, ड्रेनेज गटारीची सफाई रखडली आहे. विविध भागातील पथदिवे बंद पडल्याने नागरिकांना अंधाराला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली, तर पाहू, करू, नंतर या, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. नगरसेवकांना, तर सध्या केवळ महापौरपदाच्या खुर्चीत रस आहे. नागरी समस्यांचे त्यांना देणेघणे नाही. त्यामुळेच प्रभागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून ते मौजमजेसाठी सहलीवर (फुकटात) गेले आहेत.
महापौरपदाच्या घोडेबाजारात अनेक नगरसेवक लखपती होणार आहेत. त्यामुळे आणखी महिनाभर, तरी प्रभागातील नागरिकांना आपल्या नगरसेवकाचे दर्शन होणार नाही.
महापौरपदासाठी जूनला निवडणूक होणार आहे. सहलीवर गेलेले नगरसेवक जूनला रात्री नगरला परत येतील, त्यानंतर नवीन महापौराचे गुणगाण सत्कार समारंभात आठ दिवस जातील. ताेपर्यंत त्यांना नागरिकांच्या समस्यांची आठवणही होणार नाही.
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आधीच प्रभागातील विकासकामे ठप्प आहेत, त्यात आता मूलभूत सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देखील नागिरकांना मिळणे कठीण झाले आहे. नगरसेवक प्रभागातून पसार झाले आहेत, तर प्रशाकीय अिधकारीही उडवाउडवीची उत्तर देत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
नगरसेवकांना नागरी समस्यांचे काहीच देणेघेणे नाही, त्यांना केवळ सत्ता आिण अर्थकारणातच रस असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरातील नागरिक महिलांनी "दिव्य मराठी'शी बोलताना मंगळवारी दिल्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो....