आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपत्कालीन आराखडा कागदावर, शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने यंदा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा वेळेत तयार केला, पण हा आराखडा अजून कागदावरच आहे. पावसाळा तोंडावर आला, तरी नालेसफाई धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटलेला नाही. आपत्कालीन आराखड्याची अंमलबजावणी झाल्याने गेल्या वर्षी एका वृध्दाला जीव गमवावा लागला होता. यावर्षीदेखील हा आराखडा कागदावरच राहण्याची शक्यता आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या वतीने दरवर्षी आपत्कालीन आराखडा तयार केला जातो. नालेसफाई, धोकादायक इमारती, तुंबलेल्या गटारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तसेच सक्षम आरोग्य यंत्रणेबाबतच्या उपाययोजना आपत्कालीन आराखड्याद्वारे केल्या जातात. यावर्षी आराखडा तयार करण्यात आला असला, तरी त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही अद्याप नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे लहान-मोठे २२ आेढे-नाले पहिल्याच पावसात तुंबण्याची शक्यता आहे. काही भागात, तर नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसण्याची भीती नाकारता येत नाही. मजुरांमार्फत नालेसफाईचे काम सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा आहे, परंतु जेसीबी मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामासाठी अद्याप ठेकेदार मिळालेला नाही.
शहरातील धोकादायक इमारतींकडेदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरात धोकादायक इमारतींची संख्या शंभरापेक्षा अधिक असली, तरी मनपाकडे केवळ ४९ इमारतींचीच नोंद आहे. त्यापैकी काही इमारतींच्या मालकांनी इतर शहरांत स्थलांतर केले आहे. त्यामुळे नगरकरांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या या इमारती पाडायच्या कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या या इमारतींमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माळीवाडा, कापडबाजार, चितळे रस्ता, आडते बाजार, दिल्लीगेट, सर्जेपुरा आदी भागात या धोकादायक इमारती असून त्या पाडण्यासाठी मनपाने आतापर्यंत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. केवळ पावसाळा आला की, इमारत मालकांना नोटीस बजावून आपली जबाबदारी पार पाडल्याचा आव प्रशासन आणते. यावर्षीदेखील नेहमीप्रमाणे धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर पुढील कार्यवाही होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. गेल्या वर्षी इमारत कोसळून एका वृध्दाचा जीव गेला होता. मनपाचा आपत्कालीन आराखडा कागदावरच राहिला, तर यावर्षीदेखील अशी दुर्दैवी घटना शहरात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नोंद नसलेल्या इमारती
१००
धोकादायक इमारती
४९
एकूण ओढे-नाले
२२
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नागरिकांनी घेतला पावसाचा धसका...
बातम्या आणखी आहेत...