आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar's Painter Anuradha Thakur Paints On Cry Calender

'क्राय' दिनदर्शिकेवर ठाकूर यांची चित्रे, आंतरराष्ट्रीय संस्थेकडून नगरच्या चित्रकर्तीचा दुसऱ्यांदा गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर येथील चित्रकार अनुराधा ठाकूर यांचे हे चित्र क्रायच्या दिनदर्शिकेवर झळकले आहे.
नगर - लहानमुलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या क्राय (चाईल्ड राईटस् अँड यू) संस्थेच्या सन २०१६ च्या दिनदर्शिकेवर नगर येथील प्रसिद्ध छायाचित्रकार अनुराधा ठाकूर यांनी काढलेली चित्रे झळकणार आहेत. यापूर्वीही सन २०१२ मध्ये "क्राय'ने त्यांची चित्रे असलेली दिनदर्शिका शुभेच्छापत्रे बाजारात आणली होती.

अनुराधा ठाकूर यांनी आदिवासी जीवनावर काढलेल्या विविध चित्रमालिका देशात आणि परदेशांत गाजल्या आहेत. विशिष्ट शैलीतील फिगरेटिव्ह चित्रांबरोबरच आदिवासी सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडवणारी इथेरिअल एकॉर्ड, तर जंगलातील निसर्गाचा ताजेपणा आणि निखळ सौंदर्य दाखवणारी इथेरिअल रिदम या त्यांच्या चित्रमालिका विशेष प्रशंसनीय ठरल्या. या दोन मालिकांमधील चित्रे क्रायच्या दिनदर्शिकेवर डायरीत बघायला मिळतील.

अलीकडेच हैदराबाद येथील इनऑर्बिट मॉलमध्ये झालेल्या प्रदर्शनात अनुराधा ठाकूर यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली. इनऑर्बिट मॉलमधील ऑट्रीअन गलरीच्या उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे प्रात्यक्षिक आर्ट जर्नी प्रेझेंटेशनही यावेळी झाले. सुप्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर यावेळी उपस्थित होत्या. हिमाचल प्रदेशातील रोरीक मेमोरियल फाउंडेशनमध्येही अनुराधा ठाकूर यांची चित्रे प्रदर्शित झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन रशियन क्युरेटर डॉ. लरीसा सुरगना यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रशियातील पदाधिकारी, पंजाब ललिक कला अकादमीच्या सचिव साधना संगर, तसेच हिमाचलमधील चित्रकार मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्य
क्रायही संस्था अनेक वर्षांपासून २० राज्यांमधील १३ हजार खेडी वस्त्यांमध्ये मुलांसाठी काम करत आहे. दिनदर्शिका डायरीच्या माध्यमातून ही संस्था निधी उभा करते. क्रायची दिनदर्शिका विकत घेऊन तुम्ही या सामाजिक कार्याला हातभार लावू शकता. क्राय डॉट ओआरजी या वेबसाईटवर त्यासाठी नोंदणी करता येईल.