आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडीसाजन मंगल कार्यालयात रंगले माहेश्वरी समाजाच्या लेकींचे स्नेहसंमेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आम्ही लेकी नगरच्या' या संमेलनासाठी आलेल्या नगरच्या लेकींचे फुले उधळून स्वागत करण्यात आले. छाया: अनिल शाह.)
नगर - माहेरपणाचा आनंद घेण्यासाठी देशभरातून आलेल्या माहेश्वरी समाजाच्या लेकींचे स्नेहसंमेलन शनिवारी येथील बडीसाजन मंगल कार्यालयात झाले. फुले उधळून, दृष्ट काढून देशभरातील लेकींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बँड पथकांचा निनाद, महिलांचे फेर, फुगड्या, नृत्य यांनी या स्नेहसंमेलनात रंगत आणली.

राधिका ग्रूपने "आम्ही लेकी नगरच्या' या संमेलनाचे आयोजन केले होते. मूळच्या नगरच्या, पण लग्नानंतर देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेल्या २२ वर्षांच्या नवविवाहितेपासून तर साठी गाठलेल्या सुमारे ६५० नगरच्या लेकी या संमेलनाला उपस्थित होत्या.

राधिका ग्रूपच्या इंदिरा बिहाणी, शैला जाजू, प्रमिला डागा, शोभा खटोड, निर्मला बंग, स्मिता सारडा, शोभा काबरा, ममता झंवर, इंदिरा लखोटिया, साधना मानधना, सरिता बजाज यांनी हा उपक्रम राबवला. या संमेलनात नगरच्या लेकींनी मिसळपाव खात चहा बिस्किटांसह गप्पांची मैफल रंगली. या संमेलनानिमित्त श्रृती संगीत निकेतन या धनश्री खरवंडीकर संचलित संगीत मैफलीचा आनंद या लेकींनी लुटला. हिंदी-मराठी बालगिते, प्रेमगितांना दाद मिळाली.सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...