आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नगरच्या लेकीं'चे संमेलन येत्या शनिवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देशभरातील माहेश्वरी समाजातील "नगरच्या लेकीं'चे संमेलन शनिवारी (२७ जून) बडी साजन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. "आम्ही लेकी नगरच्या' या नावाने होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन राधिका ग्रूपने केले आहे.
मूळच्या नगरच्या, पण लग्नानंतर देशाच्या विविध भागासह देश-विदेशांत वास्तव्यास असलेल्या सातशेहून अधिक नगरच्या लेकींना राधिका ग्रूपने या संमेलनाचे नमिंत्रण पाठवले आहे. त्यातील पाचशेहून अधिकजणी संमेलनाला उपस्थित राहतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.
या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता होईल. प्रारंभी नगरच्या ज्येष्ठ संगीत अभ्यासक डॉ. धनश्री प्रा. मकरंद खरवंडीकर यांच्या श्रुती संगीत निकेतनची "माहेरची गाणी' ही मैफल होईल. वरदायिनी जोशी, अमृता देशमुख, भावना कासवा, तय्यब शेख, प्रसाद सुवर्णपाठकी अन्य कलाकार हिंदी-मराठी गाणी यावेळी सादर करतील.

या संगीत मैफलीनंतर प्रसिद्ध निवेदिका वीणा दिघे नगरच्या लेकींना बोलत्या करतील. नगरमधील लहानपणीच्या आठवणींना या नमित्ताने उजाळा दलिा जाईल. विवाहानंतर विविध क्षेत्रात घेतलेले शिक्षण, करिअर, जोपासलेले छंद याविषयीही त्या सांगतील. काही मनोरंजक खेळही यावेळी घेतले जाणार आहेत.

दुपारी तीन वाजता गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांचे "ताले अनेक - चाबी एक' या विषयावर व्याख्यान होईल. पुणे येथील ज्योतिष पंडित डॉ. सुनंदा राठी याही यावेळी मार्गदर्शन करतील. माहेश्वरी समाजाच्या नगरमधील सारडा धूत परिवाराच्या आधारस्तंभ केशरबाई धूत यांचा यावेळी सन्मान करण्यात येईल. या संमेलनासाठी मोहनलाल मानधना, बंगडीवाला परिवाराचे सीताराम बिहाणी, विष्णूप्रसाद मर्दा यांचे विशेष योगदान मिळाले आहे.
संमेलनासाठी अशी आकर्षक निमंत्रणपत्रिका तयार करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...