आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर- नांदेड मार्गावरील टोलनाका केले अखेर बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - नागपूर - नांदेड महामार्गावरील हदगावजवळील कल्याण टोलनाका 30 जूनच्या मध्यरात्रीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बंद करण्यात आला आहे़ रस्ता दुरुस्ती न केल्याचा ठपका ठेवत हा टोल बंद करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु येथील कर्मचा-यांना आणखी सात दिवस कामावर हजर राहण्याचे सांगण्यात आल्याने हा टोल नाका पुन्हा सुरू होण्याची आशा व्यवस्थापनाला आहे.

कल्याण टोल कंपनी (के़ टी़) हा टोलनाका 2006 मध्ये सुरू झालेला असून त्याचा करार 20 वर्षाचा होता़ अनेक वर्षे या रस्त्याची दुरुस्ती न करताच या कंपनीने टोलवसुली चालू ठेवली़ अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यावरही या कंपनीचे कोणीही काहीही करू
शकले नाही़. अनेक वेळा वेगवेगळया कारणांनी शिवसेना, मनसे, छावा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादीसह भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने देखील आंदोलन केले होते़ उमरखेड येथील अ‍ॅड़ संतोष जैन, नांदेडचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकेर चाउस यांनी याचिका दाखल केली होती़ माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनीही आंदोलन केले होते़ परंतु अद्याप या कंपनीने या रस्त्याची कराराप्रमाणे दुरुस्ती केली नाही़ शेवटी शासनाने या टोल नाक्यावरून ये-जा करणा-या वाहनांचे वेगळे मोजमाप घेतले व त्यावरून निर्णय घेवून वाहनधारकांना दिलासा दिला़

30 जून रोजी रात्री 12 वाजतापासून टोल नाका बंद करण्यात आला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभगााच्या कर्मचा-यांनी हजेरी लावली होती अशी माहिती मिळाली आहे़ टोलनाका बंदची नोटीस व टोलनाक्याच्या कार्यालयाला सिल ठोकून वसुली केली़ टोल नाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील कर्मचा-यांनी असे सांगितले की, व्यवस्थापनाने आणखी सात दिवस नियमितपणे हजर राहण्याचे आदेश दिले असून न्यायालयात प्रकरण सुरू आहे़ लवकरच पुन्हा टोलनाका सुरू होण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे़